BIGG BOSS : सलमान‘बिग बॉस १४’साठी २५० कोटी रुपये घेणार मानधन?

bigg-boss-14 -radhe-ma -enter-in-bigg-boss
bigg-boss-14 -radhe-ma -enter-in-bigg-boss

छोट्या पडद्यावरील प्रसिध्द शो ‘बिग बॉस’ पर्व १४ साठी सलमान खान जवळपास २५० कोटी रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या सीझन बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. या रिअॅलिटी शोचे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करतना दिसतो.

ऑक्टोबर महिन्यात बिग बॉस १४ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनच्या फॉरमॅटमध्ये थोडे बदल करण्यात आल्याचे म्हटले जात आहेत. अशातच शोसाठी सलमान किती मानधन घेणार असा ही प्रश्न अनेकांना पडला आहे. बिग बॉस पर्व १४साठी सलमान खान जवळपास २५० कोटी रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमिवर मालिकांच्या आणि चित्रपटांच्या चित्रीकरणास परवानगी देण्यात आली. मात्र त्यासाठी काही नियम तयार करण्यात आले. त्यामुळे या नियामांचे पालन करत बिग बॉसचे चित्रीकरण सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच शोचे चित्रीकरण ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार अशी माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here