Vivo Y20 आणि Y20i भारतात लाँच, किंमतही कमी

Vivo Y20 And Vivo Y20i Launched
Vivo Y20 And Vivo Y20i Launched

Vivo Y20 आणि Vivo Y20i हे दोन नवीन बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाले आहेत. व्हिवो कंपनीने या दोन्ही फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 460 चिपसेट आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. या दोन्ही फोनमध्ये मुख्य फरक रॅमचा आहे. Vivo Y20 मध्ये 4 जीबी रॅम आहे. तर, Vivo Y20i मध्ये 3 जीबी रॅम मिळेल.

Vivo Y20, Vivo Y20i किंमत

 Vivo Y20 हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंट या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून याची किंमत 12 हजार 990 रुपये आहे. हा फोन ओब्सीडियन ब्लॅक आणि डॉन व्हाइट अशा दोन रंगांमध्ये खरेदी करता येईल.

देशातील प्रमुख रिटेल स्टोअर्स, व्हिवो इंडिया ई-स्टोअर आणि अन्य प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे 28 ऑगस्टपासून फोन उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच, Vivo Y20i हा फोनही 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये आला  आहे. याची किंमत 11 हजार 490 रुपये आहे. हा फोन डॉन व्हाइट आणि नेब्युला ब्लू या दोन रंगात उपलब्ध असेल. 3 सप्टेंबरपासून सर्व पार्टनर रिटेल स्टोअर्स, व्हिवो इंडिया ई-स्टोअर आणि अन्य प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइटवर फोन खरेदी करता येईल.

Vivo Y20, Vivo Y20i  फीचर्स

ड्युअल-सिम कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट असलेले हे दोन्ही फोन अँड्रॉइडवर आधारित FunTouch OS 10.5 वर कार्यरत असतील. हँडसेटमध्ये 6.51-इंच एचडी+ (720×1600 पिक्सेल) आयपीएस डिस्प्ले मिळेल. यात एक वॉटरड्रॉप स्टाइल नॉचचा देखील समावेश आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर दोन्ही फोनमध्ये असून फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये एक 13-मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर आणि दोन अतिरिक्त 2-मेगापिक्सेलचे सेन्सर आहेत.

याशिवाय सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. कॅमेरा मोडमध्ये पोर्ट्रेट, फोटो, व्हिडिओ, पॅनोरमा, लाइव्ह फोटो, स्लो-मो आणि प्रोफेशनल मोडचा समावेश आहे. दोन्ही फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी माइक्रो-युएसबी पोर्ट, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, युएसबी ओटीजी, एफएम रेडिओ हे फीचर्स असून दोन्ही फोनला साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here