अजित पवारांनी पंतप्रधान मोदींना दिल्या शुभेच्छा; व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा!

ajit-pawar-parth pawar-narendra-modi-birthday-wish
अजित पवारांनी दिल्या पंतप्रधानांना शुभेच्छा ajit-pawar-parth pawar-narendra-modi-birthday-wish

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनीही पंतप्रधान मोदी यांचं ट्विट करून अभिष्टचिंतन केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. “भारतासारख्या महान लोकसत्ताक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला निरोगी व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! महाराष्ट्राला तसंच समस्त देशवासियांना न्याय देण्याचं काम आपल्याकडून सदैव होईल, अशी अपेक्षा आहे,” अशी अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

पार्थ पवार यांनीही मोदींना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंतप्रधानांना राष्ट्राची सेवा करण्यासाठी उत्तम आरोग्य आणि शक्ती मिळो,” असं म्हणत पार्थ पवार यांनी मोदींचं अभिष्टचिंतन केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here