ASCDCL Recruitment 2021 l औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये जम्बो भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२१ असणार आहे

union-public-service-commission-upsc-recruitment-2024-for-196-post-assistant-director-specialist-grade-assistant-and-others-read-all-details-news-update-today
union-public-service-commission-upsc-recruitment-2024-for-196-post-assistant-director-specialist-grade-assistant-and-others-read-all-details-news-update-today

मुंबई l स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (ASCDCL) मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक व्यवस्थापक, सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक, लेखापाल, प्रशासकीय सहाय्यक अशा काही पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२१ आहे.

या पदांसाठी होणार भरती

सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक (Associate Project Manager)

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)

प्रशासकीय सहाय्यक ADD CEO (Administrative Assistant Add CEO)

लेखापाल (Accountant)

निवड प्रक्रिया कशी ?

उमेदवारांची निवड मुलाखत घेऊन केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेच्या आधी संबंधित पत्त्यावर पाठवणं आवश्यक आहे.

अर्जासाठी पत्ता ?

स्मार्ट सिटी कार्यालय, वॉर रूम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ. औरंगाबाद ४३१००१ हा आहे. या पत्त्यावर उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी अर्ज करावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

पात्रता काय?

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर असणे आवश्यक आहे. तर १० वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक (Associate Project Manager) या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर आणि ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

लेखापाल (Accountant) या पदासाठी संबंधित विषयात पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक आहे. तर २ ते ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

प्रशासकीय सहाय्यक ADD CEO (Administrative Assistant Add CEO) या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर आणि अनुभव आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here