राज्यात कोरोनाचा स्फोट, ४०,९२५ नवे रूग्ण आढळले, २० जणांचा मृत्यू!

corona-covid-19-omicron-infection-patient-recovery-latest-updates-of-maharashtra-Friday-7-january-2022-news-update
corona-covid-19-omicron-infection-patient-recovery-latest-updates-of-maharashtra-Friday-7-january-2022-news-update

मुंबई:महाराष्ट्रात आज शुक्रवार (७ जानेवारी)रोजी कोरोनाचे ४०,९२५ नवीन रुग्ण आढळले. राज्यातील एकूण रूग्णांची संख्या १,४१,४९२ वर पोहचली आहे. आज २० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.०७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत एकूण ७ कोटी १ लाख ४६ हजार ३२९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्या नमुन्यांपैकी ६८ लाख ३४ हजार २२२ नमुने करोना पॉझिटीव्ह आढळले. यानुसार चाचण्यांचा करोना पॉझिटिव्हिटी रेट ९.७४ टक्के इतका आहे.

दुसरीकडे राज्यात आज १४ हजार २५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत बरे होऊन घरी परतणाऱ्या करोना रूग्णांची संख्या ६५ लाख ४७ हजार ४१० वर पोहचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात ७ लाख ४२ हजार ६८४ व्यक्ती होम क्वारंटाईनम

ओमायक्रॉन संसर्गाची स्थिती काय?

आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही. आजपर्यंत राज्यात एकूण ८७६ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ४३५ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

 शिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २७४२ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ८६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here