मधमाशांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी कालव्यात उडी, तरुणाचा बुडून मृत्यू

bhandara-man-jumps-into-canal-to-save-from-honey-bee-attack-dies-of-drowning-news-update
bhandara-man-jumps-into-canal-to-save-from-honey-bee-attack-dies-of-drowning-news-update

भंडारा:चारचाकी वाहनाने शेतावर जात असताना अचानक तरुणावर मधमाशांनी हल्ला (Honey Bee Attack) केला. या घटनेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तरुणाने कॅनॉलमध्ये (Canal) उडी घेतली, मात्र पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महेश रघु रेवतकर असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तो 25 वर्षांचा होता. ही घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी शहरात घडली.

काय घडलं?

महेश रेवतकर घरुन शेतावर जाण्यासाठी निघाला होता. रस्त्यात अचानक त्याच्यावर मधमाशांनी हल्ला चढवला. त्यामुळे तो सैरावैरा पळत सुटला. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने वाहत असलेल्या गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात उडी घेतली.

..अन् बाहेर पडण्यात अयशस्वी

पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्याला कॅनलच्या बाहेर निघता आले नाही. अखेर पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सापडल्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे.

ही घटना वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. उत्तरीय तपासणीसाठी महेशचा मृतदेह पवनी येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here