दाऊद गँगकडून मातोश्रीला उडवून देण्याची धमकी

मातोश्री बंगला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचं निवासस्थान,मातोश्रीवर सुरक्षेत वाढ

dawood ibrahim - uddhav thackeray-dubai-threar call-matoshree bungalow
dawood ibrahim - uddhav thackeray-dubai-threar call-matoshree bungalow

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकानं राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी दिली. या घटनेनंतर मातोश्री परिसरात धावपळ उडाली आहे. मातोश्रीवर दुबईतून चार कॉल आल्याची माहिती समोरी आली असून मातोश्री बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

दुबईतून मातोश्री बंगल्यावर चार कॉल

उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर चार कॉल आले. बंगला उडवून देण्याची धमकी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं दिल्याची माहिती समोर येत आहे. हे कॉल दुबईतून आले असून, त्या व्यक्तीनं दाऊदचा हस्तक असल्याचं कॉलवर सांगितलं. धमकीच्या फोननंतर मातोश्री परिसरात सुरक्षा वाढवण्यासाठी धावपळ सुरू झाली.

मातोश्री परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मातोश्री परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. कॉलची चौकशी केली जात आहे. अजून मी त्याची अधिकृत माहिती घेत आहे. पोलीस विभागाकडून याची माहिती घेत आहे. कुणी फोन केला, यासंदर्भात माहिती घेणार आहे. या प्रकरणाची गृहविभागामार्फत यांची सविस्तर चौकशी करण्यात येईल. सत्यता पडताळण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here