Mumbai local megablock : मध्य रेल्वेवर रविवारी आठ तासांचा मेगाब्लॉक

जलद मार्गावरील लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत

eight-hour-megablock-on-central-railway-Sunday-news-update
eight-hour-megablock-on-central-railway-Sunday-news-update

मुंबई:मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दोन्ही जलद मार्गावर विविध तांत्रिक कामांसाठी रविवार, १३ मार्चला आठ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. यामुळे लोकल उशिराने धावतील. 

ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. या स्थानकांदरम्यान दोनच मार्ग उपलब्ध असल्याने लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावणार असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.  कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावरही मेगाब्लॉक आहे. ब्लॉकमुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर पनवेल दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक 

पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यानही अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक घेऊन विविध कामे केली जाणार आहेत. धीम्या मार्गावरील लोकल या दोन स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here