Bihar Assembly Election 2020 l बिहार विधानसभा, तिसऱ्या टप्प्यात आज ७८ जागांवर मतदान

बिहार विधानसभा निवडणूक मतमोजणी मंगळवार १० नोव्हेंबरला

Bihar Assembly Election 2020-third-and-last-phase
Bihar Assembly Election 2020-third-and-last-phase

पाटणा Patna l बिहार Bihar विधानसभेसाठी Bihar Assembly Election 2020 आज शनिवार ७ नोव्हेंबर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे. या टप्प्यात १५ जिल्ह्यांतील ७८ जागांसाठी मतदान होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबर रोजी १७ जिल्ह्यांतील ९४ जागांसाठी ५३.५१ टक्के मतदान झाले. तसेच पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबर रोजी १६ जिल्ह्यांतील ७१ जागांसाठी ५३.५४ टक्के मतदान झाले. मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होईल. Bihar Assembly Election 2020 third and last phase

विधानसभेच्या ७८ जागांव्यतिरिक्त बिहारमधील वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. जेडीयूच्या वैद्यनाथ महतो यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर जेडीयूकडून वैद्यनाथ यांचे पुत्र सुनील कुमार निवडणूक लढवत आहेत.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तसेच विधानसभेच्या ७८ जागांसाठी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत मतदान पार पडेल. कोरोना संकटामुळे मतदार तसेच निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्क घालण्याचे तसेच सोशल डिस्टंसचे बंधन आहे.

प्रत्येक बूथवर फक्त एक हजार मतदारांचे मतदान अशी व्यवस्था आहे. पहिल्या दोन्ही टप्प्यांप्रमाणेच तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी तसेच मतमोजणीच्या दिवशीही कोविड प्रोटोकॉल लागू असेल.

बिहार विधानसभेत २४३ जागा आहेत. बहुमतासाठी १२२ जागा जिंकणे आवश्यक आहे. यंदाच्या निवडणुकीत नितीश कुमार सरकारच्या आठ मंत्र्यांचे भवितव्य पहिल्या टप्प्यात आणि चार मंत्र्यांचे भवितव्य दुसऱ्या टप्प्यात इव्हीएममध्ये बंद झाले.

विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रामुख्याने गंगा नदीच्या किनाऱ्यावरील मतदारसंघ आणि उत्तर बिहारमधील मतदारसंघांचा समावेश आहे. या पट्ट्यात एमआयएमच्या ओवैसींनी आक्रमक प्रचार केला आहे.

हेही वाचा l भाजपाचा अर्णब गोस्वामी प्रकरणावरून मानसिक विकलांगतेचा तमाशा;शिवसेनेचा हल्लाबोल

या प्रचारामुळे एनडीए आणि महागठबंधन यांच्यापैकी कोणाचा फायदा होणार आणि कोणाचा तोटा यावबाबत मतमतांतरे आहेत. काही मतदारसंघांमध्ये पप्पू यादव तसेच यादव समुदायातील नेत्यांचा प्रभाव आहे. या प्रभावाबाबत चर्चेला उधाण आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टप्प्यासाठी निवडक सभा घेऊन एनडीएला मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले. नितीश कुमार यांनी शेवटची निवडणूक लढवत आहे, असे सांगत अंतिम टप्प्यात वातावरण भावुक केले. तर नितीश कुमार यांना मत म्हणजे बिहारचे नुकसान असे सांगत चिराग पासवानांच्या नेतृत्वाखाली लोक जनशक्ती पार्टीने जोरदार प्रचार केला.

या व्यतिरिक्त मतदारांना उद्देशून पंतप्रधान मोदी यांनी अंतिम टप्प्यात एक पत्र लिहिले. बिहारच्या विकासासाठी नितीश कुमार यांची आवश्यकता आहे असे सांगत पत्राद्वारे पंतप्रधानांनी एनडीएसाठी मतदारांना अंतिम टप्प्यात जोरदार आवाहन केले.

आज या दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार Bihar Assembly Election 2020

पहिल्या दोन टप्प्यांप्रमाणेच तिसऱ्या टप्प्यातही अनेक दिग्गजांचे भवितव्य ठरेल. या टप्प्यात बिहार विधानसभा अध्यक्ष विजय कुमार चौधरी तसेच मंत्री असलेले जेडीयूचे ब्रजेन्द्र प्रसाद यादव, नरेंद्र नारायण यादव, महेश्वर हजारी, रामदेव ऋषीदेव, फिरोज अहमद, लक्ष्मेश्वर राय, बीमा भारती, मदन साहनी निवडणूक रिंगणात आहेत.

तर मंत्री असलेले भाजपचे सुरेश शर्मा, प्रमोद कुमार, बिनोद नारायण झा आणि कृष्ण कुमार ऋषी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बिहारीगंजमधून काँग्रेसच्या तिकिटावर सुभाषिनी यादव निवडणूक लढवत आहेत. सुभाषिनी यादव या समाजवादी नेता आणि माजी केंद्रीयमंत्री शरद यादव यांची कन्या आहेत. 

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here