नव्या पाणीपुरवठा योजनेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत, तर मार्चपर्यंत योजना पूर्ण करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यंत्रणांना आदेश : २६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन

Complete the first phase of the new water supply scheme by December, and the plan by March.
Complete the first phase of the new water supply scheme by December, and the plan by March.

छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी नव्याने होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचा पहिला २०० एमएलडीचा टप्पा डिसेंबरपर्यंत, तर पूर्ण योजना मार्चपर्यंत पूर्ण करा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शनिवारी (दि.२५) यंत्रणांना दिले.

फारोळा येथील २६ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन व जलपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. संदिपान भुमरे, खा. डॉ.कल्याण काळे, खा. डॉ.भागवत कराड, आ. नारायण कुचे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अनुराधा चव्हाण, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत आदी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजीनगर शहरासाठी २०१९ मध्ये सुरू झालेल्या पाणीपुरवठा योजनेला सुरुवातीला १८०० कोटींची मंजुरी मिळाली. महानगरपालिकेचा आर्थिक हिस्सा शासनाने उचलण्याचा निर्णय घेऊन या योजनेला गती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नव्याने सुरू केलेल्या अटल अमृत योजनेत या योजनेचा समावेश करण्यात आला. याच योजनेत छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचा समावेश करण्यात आला असून २७०० कोटी रुपये एकूण खर्च असलेली ही योजना जलदगतीने सुरू आहे. २०२३ मध्ये १८ टक्के वरुन २०२५ मध्ये या योजनेची प्रगती ८२ टक्क्यांपर्यत पोहोचली आहे. वॉर रूम प्रोजेक्टच्या माध्यमातून योजनेतील अडचणी दूर करून योजनेला गती दिली जात आहे.

३६५ दिवस २४ तास पाणी

नव्या योजनेची सध्या केवळ काही किरकोळ कामे बाकी आहेत. ५६ जलकुंभ तयार करण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी मोठा भाग पूर्ण झाला आहे. उर्वरित कामेही वेळेत पूर्ण करून पुढील २५-३० वर्षे शहराला ३६५ दिवस २४ तास शाश्वत पाणीपुरवठा देता येईल. महानगरपालिकेचा ८०० कोटी रूपयांचा हिस्सा शासनाने हुडकोमार्फत उपलब्ध करून दिला आहे. पुढील महिन्यात याबाबतची आवश्यक प्रक्रिया पूर्ण होऊन हा निधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ठेकेदाराला विचारले योजना कधी पूर्ण होईल?
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरासाठी होणाऱ्या नव्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा चित्रफितीच्या माध्यमातून देण्यात आला. संपूर्ण योजनेचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. मुख्य जलवाहिनीचे काम फक्त ७०० मीटर बाकी आहे, तर जायकवाडी धरणातील जॅकवेलमध्ये पंप हाऊसचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. ही माहिती ऐकल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट ठेकेदार जीव्हीपीआरचे संचालक शिवा रेड्डी यांना ही योजना कधी पूर्ण होईल असे विचारले. त्यावेळी त्यांनी मार्चपर्यंत पूर्ण होईल असे सांगितले. यावर फडणवीस म्हणाले, ‘काहीही झाले तरी डिसेंबरपर्यंत नव्या पाणीपुरवठा योजनेचा पहिला टप्पा सुरू झाला पाहिजे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here