मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस व ‘वंचित’ची आघाडी; वंचित ६२ जागा लढवणार; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व ‘वंचित’चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची घोषणा.

Congress and Vanchit Aghadi have formed an alliance for the Mumbai Municipal Corporation elections; Vanchit will contest 62 seats; decisions regarding other municipal corporations will be taken at the local level.
Congress and Vanchit Aghadi have formed an alliance for the Mumbai Municipal Corporation elections; Vanchit will contest 62 seats; decisions regarding other municipal corporations will be taken at the local level.

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) व वंचित बहुजन आघाडी (VBA) यांच्यात आज आघाडीचा निर्णय झाला. मुंबईत वंचित बहुजन आघाडी ६२ जागा लढणार आहे. राज्यातील इतर २८ महानगरपालिकेतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईलतसे अधिकार दोन्ही पक्षाने दिलेले आहेत. आज काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनी आघाडीचा निर्णय झालायाला विशेष महत्व आहे. काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व ‘वंचित बहुजन आघाडी’चे (VBA) प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी आघाडीची घोषणा केली.

टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंतप्रदेश उपाध्यक्ष तथा मुख प्रवक्ता सिद्धार्थ मोकळेवंचितचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरेमुंबई महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल सोहनीमुंबई युवा आघाडी अध्यक्ष सागर गवई उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले कीकाँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांची युती ही नैसर्गिक युती आहे. दोन्ही पक्षांची वैचारिक भूमिका एकच आहे. दोन्ही पक्ष संविधानवादी आहेतसंविधानाला अभिप्रेत भारत घडवणे हा दोघांचा विचार आहे. समताबंधुत्व व सामाजिक न्यायाची भूमिका एकच आहे. दोन्ही पक्ष संवैधानिक मुल्यांशी तडजोड करणारे नाहीत. १९९८ व १९९९ च्या निवडणुकीत दोन्ही पक्षात आघाडी झाली होतीआता पुन्हा २५ वर्षांनी दोन पक्ष एकत्र आले आहेत. या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागला पण आजपासून नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. हा आकड्यांचा खेळ नसून विचारांचा मेळ आहेअसे सपकाळ म्हणाले.

वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यावेळी म्हणाले कीदेश विघातक भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. आघाडीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिले पाऊल टाकले व सुरुवातीपासूनच सकारात्मक भूमिका घेतली होती. मुंबई महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर लढणार आहेअसे पुंडकर यांनी सांगितले.

वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे म्हणाले कीआघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा कधीच समाधानकारक होत नसते पण कुठेतरी थांबावे लागते. आघाडीसाठी दोन्ही बाजूकडून सकारात्मक चर्चा झाली. मुंबई महापालिकेसाठी आज आघाडी जाहीर करण्यात आली असून इतर महानगरपालिकेत दोन्ही पक्षांचे स्थानिक नेतृत्व सकारात्मक निर्णय घेईलअसे मोकळे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here