CM Eknath Shinde l एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री!

तत्त्वाची लढाई असल्याने हा निर्णय भाजपने घेतला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे

Chief Minister Shinde says We are determined to solve the problems of development in Marathwada
Chief Minister Shinde says We are determined to solve the problems of development in Marathwada

मुंबई:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री (CM) होणार असल्याची मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. इतकंच नाही तर आज त्यांचा एकट्याचाच शपथविधी होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

रोज वीर सावरकरांचा अपमान, रोज हिंदुत्वाचा अपमान या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. संभाजी नगर, धाराशिव, दी. बा. पाटील हे निर्णय घाई घाईने घेतले गेले.शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका मोठ्या गटाची कुचंबणा होत होती. आमच्याच मतदार संघात आमचे हरलेले विरोधक त्यांना रोज निधी मिळत असेल तर कसं चालेल? काँग्रेस राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडा असा निर्णय या गटाने घेतला.

दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी या आमदारांऐवजी काँग्रेस राष्ट्रवादीलाच महत्त्व दिलं. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मी अडीच वर्षे सांगत होतो की हे सरकार पडेल. एकनाथ शिंदे यांचा विधीमंडळ गट, अपक्ष आमदारांचा विधीमंडळ गट या सगळ्यांचं पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे.

आम्ही सत्तेच्या मागे नाहीत. ही विचारांची लढाई आहे, हिंदुत्वाची लढाई आहे त्यामुळे भाजपने हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देतंय आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील ही घोषणा करण्यात आली आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here