…मग कोरोनामुळे निधन झालेल्यांच्या मृत्यू दाखल्यावरही मोदींचा फोटो लावा”

global-hunger-index-india-fall-behind-pakistan-nepal-financial-condition-news-update-today
global-hunger-index-india-fall-behind-pakistan-nepal-financial-condition-news-update-today

चंदीगड: कोरोना लसीकरण केल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असल्याने पंजाबमधील एका व्यक्तीने लस घेण्यास नकार दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो जबरदस्तीने या प्रमाणपत्रावर लावण्यात आल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे. यासंदर्भात या व्यक्तीने राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्रही लिहिलं आहे.ex-jun-professor-refuse-vaccination-as-pm-modi-photo-is-printed-on-vaccination-certificate-news-update

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो असण्यावरुन वाद निर्माण झाला होता. आता पंजाबमधील एका प्राध्यापकाने लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो काढा नाहीतर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृत्यू दाखल्यांवरही मोदींचा फोटो छापा अशी मागणी केलीय.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून निवृत्त झालेल्या प्राध्यापक चमनलाल यांनी मोदींच्या फोटोमुळे लस टोचून घेण्यास नकार दिलाय. मोदींचा फोटो लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर असल्याने आपण लस घेतली नाहीय असं चमनलाल सांगतात.

कोरोनाची लस घेतलेल्या प्रमाणपत्रावर एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणं अपेक्षित आहे, असंही चमनलाल म्हणालेत. ७४ वर्षीय चमनलाल यांनी आपण लसीकरणास पात्र असून पंजाबमधील वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण करणं गरजेचं असल्याचं मान्य केलं असलं तरी या ‘खासगी आणि सामाजिक विरोधामुळे’ लस घेत नसल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा : Coronavirus Cases India l कोरोनाचा हाहाकार, देशात २४ तासांत ३ लाख ७९ हजार रुग्ण आढळले; ३६४५ मृत्यू

इतर देशांमधील कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवर राजकीय नेत्यांचे फोटो छापलेले नाहीत, असंही चमनलाल सांगतात. भारतामध्ये लसीकरण करण्यात आलेल्या लोकांना सत्तेत असलेल्या नेत्याच्या फोटोसहीत प्रमाणपत्र दिलं जात आहे, याबद्दल चमनलाल यांनी नाराजी व्यक्त केलीय.

हेही वाचा : Parambir Singh l परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

कोरोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूंसाठी सत्ताधारी पक्षच जबाबदार असल्याचा आरोप चमनलाल यांनी केलाय. पंजाब सरकारने करोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवावा अशी मागणी चमनलाल यांनी केली आहे.

मागील सात वर्षांपासून मोदी सत्तेत आहेत. ते प्रत्येक जागी स्वत:ची जाहिरात करताना दिसतात. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांच्या फोटोची काय गरज आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो लावला जात असेल तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूच्या दाखल्यांवरही मोदींचा फोटो लावण्यात यावा असंही चमनलाल यांनी आजतकशी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा : विदेशी मीडिया:प्रधानमंत्री के घमंड से भारत में खौफ का मंजर

कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरुन वाद होण्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी महाराष्ट्रातील सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांनी मोदींच्या या फोटोसंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here