Corona Vaccination in India: भारताचा नवा विक्रम! १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार

भारताने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला आहे. देशातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी १६ जानेवारी २०२१पासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर लसीकरणावर अधिक भर देऊन ही मोहीम वेगाने राबवण्यात आली. आज २७७

india-covid-19-vaccine-doses-administered-in-india-crosses-100-crore-milestone-news-update
india-covid-19-vaccine-doses-administered-in-india-crosses-100-crore-milestone-news-update

नवी दिल्ली: भारताने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला आहे. देशातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी १६ जानेवारी २०२१पासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर लसीकरणावर अधिक भर देऊन ही मोहीम वेगाने राबवण्यात आली. आज २७७ दिवसात भारताने विक्रमी कामगिरी केली आहे.

 या ऐतिहासिक दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावर जगातील सर्वात मोठा ध्वज फडकवला जाणार आहे. तसेच देशातील या सुवर्ण कामगिरीमुळे ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. देशातील १०० ऐतिहासिक वास्तुंना तिरंग्याच्या रुपात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याद्वारे सर्व आरोग्य कर्मचार, फ्रंटलाईन वर्कर्स, वैज्ञनिका, लस उत्पादक यांचा सन्मान करून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहली जाणार आहे.

(India crosses milestone of 100-crore Covid-19 vaccine doses)

कोविन डॅशबोर्डच्या माहितीनुसार, आतापर्यंत १०० कोटी १५ हजार ७१४ जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी ७० कोटी ८३ लाख १८ हजार ७०३ जणांनी पहिला डोस घेतला असून २९ कोटी १६ लाख ९७ हजार ११ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

यानिमित्ताने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार एका वृत्तवाहिनीसोबत बातचित करताना म्हणाल्या की, आजचा दिवस हा सर्व भारतवासियांसाठी महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. भारताची ओळख आत्मनिर्भर असून लस तयार करून ९ महिन्यांत १०० कोटी लसीकरण पार करणारा देश ठरला आहे.

मी सर्वांचेच आभार व्यक्त करते. यामध्ये प्रचंड मोठे योगदान असून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, वैज्ञानिक या सर्वांनी खूप मेहनत केली आहे. तसेच देशातील सक्षम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या काळात सातत्याने पालकांसारखे लक्ष्य ठेवून प्रत्येक ठिकाणी लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. प्रत्येक राज्यासोबत संवाद साधून अडचणीवर मात करत १०० कोटींचा लसीकरणाचा टप्पा पार करण्यात आला आहे. आज अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here