Chhath puja l…यालाच म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःच्या तोंडाला काळं फासणं : सचिन सावंत

कोरोनामुळे मुंबईत समुद्रकिनाऱ्यांवर छटपूजेला बंदी, आमदार राम कदमांना काँग्रेसचं प्रत्युत्तर

Bjp-godi-parambir-sing-media-sachin-sawant-thackeray-government
Bjp-godi-parambir-sing-media-sachin-sawant-thackeray-government

मुंबई  l मुंबईसह देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर छटपूजा Chhath puja करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा नेते राम कदम Ram kadam यांनी महाविकासआघाडी सरकारवर केलेल्या टीकेला, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत Sachin Sawant यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

भाजपाशासीत राज्यांमध्येही छटपुजेचा Chhath puja उत्सव साजरा करण्यावर निर्बंध

”यालाच म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःच्या तोंडाला काळं फासणं. भाजपा नेत्यांना हे देखील माहिती नाही की, भाजपाशासीत राज्यांमध्येही छटपुजेचा Chhath puja उत्सव साजरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसं आरएसएस इटलीमधूनच स्थापन झाली होती, हे तर ऐतिहासिक सत्य आहे.” असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे. त्यांनी या ट्विटसोबतच राम कदम यांचं ट्विट देखील जोडलेलं आहे.

आमची चेतावणी आहे छटपुजेला परवानगी द्यावी लागेल

दरम्यान, छटपूजेस परवानगी न देण्याच्या निर्णयावरून राम कदम यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधत म्हटले होते की, ”रावणराज चालवणारे मुघलशाही महाविकासआघाडी सरकार हिंदू धर्माच्या सणांना विरोध करणं केव्हा बंद करणार?

अन्य धर्मांच्या सणांना परवानगी देण्यासाठी जी तत्परता दाखवतात, ती हिंदू धर्मासाठी का नाही? महाविकासआघाडी सरकारचे निर्णय काय इटलीतून होतात का? आमची चेतावणी आहे छटपुजेला परवानगी द्यावी लागेल.”

हेही वाचा l Ram kadam l भाजपा आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात

या अगोदर राज्यातील धार्मिक स्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून देखील राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला होता.

”कुंभकर्णी निद्रित असणारे अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागे झाले. डरपोक सरकारचा मोठा पराभव! जनतेचा अखेर मोठा विजय!” असं राम कदम यांनी ट्विट केलं होतं. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सुध्दा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here