Corona updates : चोवीस तासांत ९७ हजार नवे रुग्ण

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं ४६ लाखांचा टप्पा ओलांडला

india-reports-412262-new-corona-cases-highest-in-the-day-news-update
india-reports-412262-new-corona-cases-highest-in-the-day-news-update

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा थैमान मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गेल्या चोवीस तासांत देशात कोरोनाबाधितांच्या ९७ हजार ५७० नव्या रूग्णांची नोंद झाली. देशात १ हजा २०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यविभागाकडून देण्यात आली. आता देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं ४६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

चोवीस तासांत देशात ९७ हजार ५७० नव्या रुग्णांची नोंद झाली असून १ हजार २०१ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४६ लाख ५९ हजार ९८५ वर पोहोचली आहे. देशात सध्या ९ लाख ५८ हजार ३१६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ३६ लाख २४ हजार १९७ रूग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ७७ हजार ४७२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) पहिल्या देशव्यापी सीरो सर्वेक्षणाच्या अहवालात खळबळजनक माहिती समोर आली. ११ मे ते ४ जून या काळात २१ राज्यांतील २८ हजार जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. एकूण ६४ लाख ६८ हजार ३८८ नागरिक कोरोनाबाधित झाले होते. हे सर्वेक्षण ग्रामीण भागांमध्ये अधिक केले गेल्यामुळे या भागांमध्ये संसर्गाचे प्रमाण तुलनेत अधिक असल्याचे नोंदले गेले आहे.

बाधितांचे प्रमाण ग्रामीण भागांमध्ये ६९.४ टक्के, शहरी झोपडपट्टय़ांमध्ये १५.९ टक्के, शहरी उर्वरित भागांत १४.६ टक्के असे होते. वयोमानाप्रमाणे १८ ते ४५ वयोगटात हे प्रमाण ४३.३ टक्के, ४६-६० वर्षे वयोगटात ३९.५ टक्के, तर ६० वर्षांवरील वयोगटात १७.२ टक्के होते. सर्वेक्षणातील अनुमानानुसार, आरटीपीसीआर चाचणीतून एक बाधित व्यक्ती सापडली तर ८२ ते १३० बाधित असलेल्या पण न सापडलेल्या व्यक्ती होत्या. कोरोनाची बाधा एक टक्क्यापेक्षा कमी लोकांना झाल्याचे आढळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here