कार्टून प्रकरणी शिवसेना शाखाप्रमुखासह सहा कार्यकर्त्यांना अटक

कार्टून शेअर प्रकरणी निवृत्त नौदल अधिका-याला झाली होती मारहाण

shiv-sena-members-for-attack-on-ex-navy-officer-in-kandivali- arrested 6 person
shiv-sena-members-for-attack-on-ex-navy-officer-in-kandivali- arrested 6 person

मुंबई : निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सहा जणांना अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं एक कार्टून शेअर केल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांकडून आपल्यावर हल्ला करण्यात आला होता अशी तक्रार निवृत्त नौदल अधिकाऱ्याने दिली होती. 

यामध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख आणि एका कार्यकर्त्याचा समावेश आहे. कांदिवली पश्चिम येथे ही मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज शुक्रवारी व्हायरल झालं होतं. यानंतर भाजपा नेत्यांनी शिवसेनवेर टीका करत कारवाईची मागणी केली होती.

अटक करण्यात आलेल्या सहा जणांमध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख कमलेश कदम आणि कार्यकर्ता संजय मांजरे यांचा समावेश आहे. शिवसेना कार्यकर्त्यांकडून आपल्यावर हल्ला करण्यात आला अशी तक्रार यांनी दिली होती. समता नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here