Jacqueline Fernandez granted interim bail : २०० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी जॅकलीन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आज दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

jacqueline-fernandez-granted-interim-bail-in-rs-200-crore-scam-case-sukesh-chandrashekhar-news-update-today
jacqueline-fernandez-granted-interim-bail-in-rs-200-crore-scam-case-sukesh-chandrashekhar-news-update-today

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आज दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. (Jacqueline Fernandez granted interim bail ) कथित आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनला आरोपी म्हणून न्यायालयात हजर केलं होतं. सक्तवसुली संचालनालयाने ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ नुसार गुन्हा सुकेश चंद्रशेखरवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीने जॅकलिन फर्नांडिसला आरोपी करत अलीकडेच न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं.

या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने जॅकलिनला २६ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला दोनदा चौकशीसाठी बोलावले आहे. मनी लॉंडरिंगप्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिनने कोट्यवधींच्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप तिच्यावर आहे. आरोपी सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here