राज्यातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जाहीर

maharashtra-election-commission-announced-date-for-grampanchayat-by-elections-news-update
maharashtra-election-commission-announced-date-for-grampanchayat-by-elections-news-update

मुंबई :राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यू. पी. एस. मदान यांनी अधिकृतपणे याबाबतची माहिती जारी केली आहे.

राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे”, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं.

असा राहिल पोटनिवडणुकीचा  कार्यक्रम  

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी 7 डिसेंबर 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. त्यानंतर मतदान हे 21 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 पर्यंतच असेल. या सर्व ठिकणी 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here