मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (kangna Ranaut) पुन्हा शिवसेनेला डिवचले आहे. भिवंडी इमारत दुर्घटनेची तुलना तिने पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी केली आहे. भिवंडी इमारत दुर्घटनेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या घरावर बेकायदेशीरपणे कारवाई केली जात होती. त्यावेळी तेवढं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर जवळपास ५० लोक जिवंत असते असं कंगनाने म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे, संजय राउत @mybmc जब मेरा घर ग़ैर क़ानूनी तरीक़े से तोड़ रहे थे, उस वक्त उतना ध्यान इस बिल्डिंग पे दिया होता तो आज यह लगभग पचास लोग जीवित होते, इतने जवान तो पुलवामा में पाकिस्तान में नहीं मरवाए जितने मासूमों को आपकी लापरवाही मार गयी, भगवान जाने क्या होगा मुंबई का 🙏 https://t.co/BBkj8APfnu
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 24, 2020
कंगना ट्विटमध्ये म्हणाली…
कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “उद्धव ठाकरे, संजय राऊत…जेव्हा माझं घर बेकायदेशीरपणे तोडलं जात होतं, तेव्हा तितकं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर आज जवळपास ५० लोक जिवंत असते. पाकिस्तानने केलेल्या पुलवामा हल्ल्यात इतके जवान नाही मारले गेले जितके निष्पाप तुमच्या निष्काळजीपणामुळे गेलेत. मुंबईचं काय होणार देवालाच माहित’’. कंगनाने ट्विटमध्ये महापालिकेलाही टॅग केलं आहे.
भिवंडी शहरातील सोमवारी इमारत दुर्घटना घडली
भिवंडी शहरातील सोमवारी पहाटेच्या सुमारास पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत कोसळली. एनडीआरएफ जवानांकडून या ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू झालं होतं. दुर्घटनेतील मृतांची संख्या ४१ वर पोहचली असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे.
वाचा सविस्तर : कंगनाने भिवंडी इमारत दुर्घटनेचा पुलवामाच्या घटनेशी केला क्लिक click करा
इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसंच, या दुर्घटनेची चौकशीचे आदेश दिले आहेत.