Us-president-election l “लोकशाही ज्या वाटेनं चालली ते पाहून भीती वाटते”

आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली चिंता

Us-election-president-election-mla-ncp-rohit-pawar-violence
Us-election-president-election-mla-ncp-rohit-pawar-violence

मुंबई l अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक Us-president-election निकालावरून तेथे तणाव आहे. काही शहरांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. काही ठिकाणी या दोन्ही गटांमध्ये हिंसक झटापटीही झाल्या, तर काही ठिकाणी तर पोलीस विरुद्ध विरोधक आंदोलक असं चित्र दिसून आलं होतं या मुद्यावर आमदार रोहित पवार Rohit pawar यांनी चिंता व्यक्त केली आहे.

राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी Us-president-election झालेल्या मतांची मोजणी थांबवण्यात आल्यानंतर वॉशिंग्टन, विस्कॉन्सिन, फिलाडेल्फिया, पोर्टलॅण्ड, न्यूयॉर्कसहीत अनेक ठिकाणी बायडन आणि ट्रम्प समर्थक समोर समोर आल्याचे पाहायला मिळालं होतं. काही ठिकाणी या दोन्ही गटांमध्ये हिंसक झटापटीही झाल्या.

हेही वाचा l Pune Rape Case l लग्नाचे आमिष दाखून आतेभावानेच केला बहिणीवर बलात्कार

“जगातील सर्वांत जुनी लोकशाही असलेला व विकसित देश म्हणून आपण अमेरिकेकडं पाहतो. पण इथं शांततामय व लोकशाही मार्गाने सत्तांतर होण्याऐवजी लोक हाती बंदुका घेऊन रस्त्यावर उतरत असतील, तर ती लोकशाही ज्या वाटेनं चालली ते पाहून भीती वाटते व असं होऊ नये म्हणून सर्वच देशांनी प्रयत्न करायला हवेत,” असं रोहित पवार Rohit pawar यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा l WhatsApp Pay l आता Whatsapp वरुन पैसे करा ट्रान्सफर

अनेक ठिकाणी ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलक रस्त्यावर उतरुन घोषणा देत होते. “Whose streets? Our streets!” आणि “If we don’t get no justice, they don’t get no peace!” अशी घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात आली. त्याचबरोबर आंदोलकांनी काही ठिकाणी पोलिसांच्या गाड्यांची नासधूस केली. ज्या ठिकाणी हिंसा होऊ शकते अशा ठिकाणामधील दुकानं बंद ठेवण्यात आली होती.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here