मुंबई : कुंभमेळ्यामध्ये हजारो लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर कुंभमेळा प्रातिनिधिक स्वरूपात होत असून, राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनाबद्दल शंका उपस्थित केली आहे. kumbh-mela-2021-haridwar-kumbh-mela-ncp-minister-jitendra-awhad-pm-narendra-modi-news-update
उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं. मात्र, कुंभमेळा सुरू होण्याच्या तोंडावरच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. त्यामुळे कुंभमेळा रद्द करण्याचीही मागणीही झाली. मात्र, त्याला कारणं देत नकार देण्यात आला. अखेर कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अनेक आखाड्यांनी समाप्त झाल्याची घोषणा केली. तर पंतप्रधानांच्या आवाहनानंतर प्रातिनिधिक स्वरूपात कुंभमेळा पार पडला.
कुंभ हा दर 12 वर्षांनी येतो … मग 2022 ला येणारा कुंभमेळा 2021 मध्ये का घेतला … केंद्र सरकारनी व राज्य सरकारनी त्याला मान्यता का दिली ….
कोरोनाचा झालेला प्रसाराची व त्यामुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी घेणार का …..
महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे अभिनंदन ….— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 21, 2021
दरम्यान, कुंभमेळ्याच्या आयोजनावरूनच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आव्हाडांनी यांनी ट्विट करत या शंका उपस्थित केल्या आहेत. तसेच पंढरपूरच्या वारीसह इतर वाऱ्या घरी राहून पार पाडल्याबद्दल महाराष्ट्रातील वारकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
“कुंभ हा दर १२ वर्षांनी येतो… मग २०२२ला येणारा कुंभमेळा २०२१ मध्ये का घेतला…? केंद्र सरकारने व राज्य सरकारने त्याला मान्यता का दिली….? कोरोनाच्या झालेल्या प्रसाराची व त्यामुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी घेणार का…?,” असा केंद्राला सवाल करत ‘महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे अभिनंदन…,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
या ट्विटमध्येच आव्हाडांनी नेपाळच्या पूर्वीचे राजे ज्ञानेंद्र वीर विक्रम शाह देव आणि राणी कोमल यांना कोरोना झाल्याचं म्हटलं आहे. ते हरिद्वामधील कुंभमेळ्याला महाकुंभमेळ्याला उपस्थित होते, असंही आव्हाड यांनी सांगितलं. या ट्विटमध्ये आव्हाडांनी राजे ज्ञानेंद्र यांचा फोटोही पोस्ट केला आहे.





















































































































































































