Airtel ग्राहकांसाठी फ्री 6GB पर्यंत 4G डेटा

airtel-expands-free-data-coupon- plan
airtel-expands-free-data-coupon- plan

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी 6 जीबीपर्यंत फ्री डेटा देणारी एक नवीन ऑफर आणली आहे. कंपनीने जुलै महिन्यात ‘फ्री डेटा कूपन’ ऑफर आणली होती. सुरूवातीला या 219 रुपये, 249 रुपये, 279 रुपये, 298 रुपये, 349 रुपये, 398 रुपये, 399 रुपये, 449 रुपये, 558 रुपये, 598 रुपये आणि 698 रुपये या प्रीपेड प्लॅन्ससाठी ही ऑफर होती. आता कंपनीने ही ऑफर 289, 448 आणि 599 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनवरही उपलब्ध असणार आहे.

ही आहे ऑफर

फ्री डेटा कूपनअंतर्गत कंपनी ग्राहकांना 1 जीबी डेटाचे काही कूपन मोफत देत आहे. काही प्लॅनसोबत असे दोन कुपन तर काही प्लॅनसोबत चार आणि सहा कूपन दिले जात आहेत. अशाप्रकारे ग्राहकांना जास्तीतजास्त 6 जीबी मोफत डेटा मिळत आहे. 219 रुपये, 249 रुपये, 279 रुपये, 298 रुपये, 349 रुपये, 398 रुपये, आणि 448 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसोबत दोन कूपन मिळत आहेत.

प्रत्येक कूपनची व्हॅलिडिटी 28 दिवस आहे. तर, 399 रुपये, 449 रुपये आणि 558 रुपयांच्या प्लॅनसोबत चार कूपन दिले जात आहेत. याची व्हॅलिडिटी 56 दिवस आहे. याशिवाय 598 आणि 698 रुपयांच्या प्लॅनसोबत 6 कूपन मिळत आहेत. याची व्हॅलिडिटी 84 दिवस आहे. पण या ऑफरसाठी कंपनीने एक अट ठेवली आहे. यानुसार एअरटेल थँक्स अ‍ॅपद्वारे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांनाच या ऑफरचा लाभ मिळेल.

एअरटेल आपल्या युजर्सना फ्रीमध्ये Disney+ Hotstar VIP चं मोफत सबस्क्रिप्शन मोफत देत आहे. तसं बघायला गेलं तर ग्राहकांना फक्त Disney+Hotstar VIP चं एका वर्षाचं सब्सक्रिप्शन घेण्यासाठी 399 रुपये मोजावे लागतात. पण, एअरटेलकडून आपल्या काही प्रीपेड प्लॅन्समध्ये हे मोफत दिलं जात आहे.

599 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या 599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डाटा आणि रोज 100 एसएमएस वापरण्यास मिळतील. तसेच, एअरटेल थँक्स आणि मोफत Disney+Hotstar VIP सब्सक्रिप्शन मिळेल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 56 दिवसांची आहे.

448 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा वापरण्यास मिळेल. या प्लॅनमध्येही सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसोबत रोज 100 SMS वापरण्यास मिळतील. तसेच, एअरटेल थँक्स आणि मोफत Disney+Hotstar VIP सब्सक्रिप्शन मिळेल. पण या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे.

499 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या 499 रुपयांच्या प्लॅनमध्येही 448 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच सर्व सेवा मिळतात. पण हा प्लॅन फक्त पहिल्यांदा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठीच आहे.

2,698 रुपयांचा प्लॅन

एअरटेलकडे Disney+ Hotstar VIP सब्स्क्रिप्शन देणारा 2,698 रुपयांचा रिचार्ज प्लॅनही आहे. यामध्ये 365 दिवसांच्या वैधतेसह म्हणजेच एका वर्षासाठी दररोज 2जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगचा आणि रोज 100 एसएमएसची सर्व्हिस या प्लॅनमध्ये मिळते.

कंपनीने आपल्या 401 रुपयांच्या Disney+ Hotstar VIP प्लॅनमध्येही बदल केला आहे. 401 रुपयांच्या या प्लॅनमध्ये आता कंपनी आपल्या युजर्सना आधीपेक्षा 10 पट जास्त डेटा देत आहे. कंपनी या प्लॅनमध्ये आता 3GB डेटाऐवजी 30 जीबी डेटा देत आहे.  28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये  मोफत व्हॉइस कॉलिंग किंवा एसएमएसची सेवा युजर्सना भेटत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here