Video : राज्यमंत्री सत्तार यांच्या ताफ्यासमोर ABVP कार्यकर्त्यांचा राडा!

पोलिसांनी राडेबाज कार्यकर्त्यांना चोपले

Abdul Sattar's convoy stopped the ABVP workers
Abdul Sattar's convoy stopped the ABVP workers

धुळे : महसूल राज्यमंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार धुळे दौ-यावर होते. अचानक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सत्तार यांचा ताफा रोखला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली व ताब्यात घेतले.

अब्दुल सत्तार हे धुळ्याच्या दौऱ्यावर असताना येथील अभाविपच्या कार्यकर्त्यांनी करोना काळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांची फी माफ करावी या मागणीसाठी सत्तार यांच्या वाहनांचा ताफा अडवला. त्यानंतर सत्तार यांचे सुरक्षा रक्षक असलेल्या पोलिसांनी या विद्यार्थ्यांना मारहाण केली.

या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल – पालकमंत्री अब्दुल सत्तार

“वाहनातूनची मी या कार्यकर्त्यांना सांगितलं की, मी चर्चा करण्यासाठी तयार आहे. मात्र, त्यांनी आपल्या तोंडाला मास्कही लावले नव्हते, हे स्विकारार्ह नव्हतं. दरम्यान, जर पोलिसांनी त्यांना विनाकारण मारलं असेल तर त्याची चौकशी केली जाईल.”

संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी – देवेंद्र फडणवीस (विरोधीपक्ष नेते)

 “अभाविपच्या कार्यकर्त्यांविरोधातील अशा प्रकारच्या हिंसेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. अशाप्रकारे त्यांच्यासोबत कृत्य करण्याऐवजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांचं म्हणणं ऐकून त्यांच्या प्रश्नांबाबच चर्चा करायला हवी होती. याविरोधात सबंधितांवर कडक आणि कठोर कारवाई करण्यात यावी.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here