
मुंबई: पेट्रोलने अखेरीस शतकाची नोंद केली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलमधील महागाईने वाहनधारकांच्या खर्चात प्रचंड वाढ केलेली असताना आता घरगुती वापराचा गॅस सिलिंडर LPG price hiked by rs 50 per cylinder आज मध्यरात्रीपासून (मंगळवार) ५० रुपयांनी महागणार आहे. यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून टाकणार आहे.
मुंबईत गॅस सिलिंडरसाठी आता ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागतील. डिसेंबरनंतर गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली ही चौथी दरवाढ आहे. याआधी एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा भाव ७८९.५० रुपयांपर्यंत वाढला होता.
कोरोना रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमध्ये देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज इंधन दर निश्चित केले जातात.
तर गॅस सिलिंडरच्या किमतीचा दर १५ दिवसांनंतर किंवा महिनाभराने आढावा घेतला जातो. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि चलन विनिमय यानुसार कंपन्या किरकोळ विक्रीसाठी इंधन दर निश्चित करतात. देशभरात २८ कोटी ७० लाख एलपीजी ग्राहक आहेत.
आज मध्यरात्रीपासून (मंगळवार) मुंबईत गॅस खरेदीसाठी ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागतील. त्यामध्ये ५० रुपयांची वाढ होणार आहे. सध्या १४ किलोचा (अनुदानीत) गॅस सिलिंडरची किंमत ७१९ रुपये आहे. त्यात मध्यरात्रीपासून ५० रुपयांची वाढ होणार आहे.
एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा दर ७८९.५० रुपयांवर पोहोचला होता. त्यावेळी सिलिंडर आठशे रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोनशे रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.
पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असतानाच घरगुती गॅस सिलिंडरनेही जोराचा झटका दिलेला आहे. या दरवाढीचा फटका विनाअनुदानित गॅस सिलिंडर घेणाऱ्यांना बसत आहे. अनुदानित गॅस सिलिंडरधारकांना मिळणारी सबसिडीसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
गॅस सिलिंडरच्या किमतीत डिसेंबरपासून वाढ होत आहे. १ डिसेंबर २०२० रोजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १६ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा सिलिंडर ५० रुपयांनी महागले. त्यानंतर ४ फेब्रुवारी विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा १६ फेब्रुवारीपासून सिलिंडर ५० रुपयांनी महागणार आहे.
हेही वाचा:
महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने?; अजित पवार, टोपेंनी दिला ‘हा’ इशारा
टिक टॉक स्टार पूजा चव्हाण प्रकरणी धनंजय मुंडेंचं महत्वाचं विधान; म्हणाले…
पहली बार अंतरिक्ष में भगवद् गीता और PM मोदी की फोटो के साथ जाएंगे 25 हजार लोगों के नाम
“कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल”, दिशा रवीच्या अटकेवरुन शशी थरुर संतापले









































































































































