मनसेचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना घराबाहेर पडण्याचा सल्ला, म्हणाले…  

अन्यथा लोकांचा 'ठाकरे' नावावरील विश्वास उडेल

There is no problem in holding elections after census: Raj Thackeray
There is no problem in holding elections after census: Raj Thackeray

राज्यात काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या परतीच्या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल.’ असा सल्ला मनसे नेते माजी मंत्री बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिला आहे.

मनसे नेते बाळानांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचे हाल पाहून घराबाहेर पडण्यास सांगितले आहे. नांदगावकर यांनी शेतकऱ्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्यानंतर शेतकऱ्यांची कशी अवस्था झाली हे दाखवण्यात आले आहे. शेतकरी पीक वाहून गेल्यामुळे आक्रोश करताना दिसत आहेत. संपूर्ण शेतात पाणी साचल्याचे दिसत आहे.

बाळा नांदगावकर यांनी ट्विट केले की, ‘मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल.’

वाचा l  एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल अजित पवार यांचं मोठं विधान, म्हणाले…

लेकराप्रमाणे वाढवलेले शेतकऱ्यांचे पीक त्यांच्या डोळ्यांसमोर पाण्यात वाहून गेले आहे. अनेक पीके ही आडवी पडली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून काही तरी मदत मिळावी यासाठी सरकारकडे विनवणी शेतकरी करत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.

 वाचा l Flipkart Big Billion Day लॅपटॉप,टीव्ही,कपडे,फर्निचरसह इतर वस्तूंवर धमाकेदार ऑफर्स

 

 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here