MNS: मनसे नेत्याला बलात्कार प्रकरणी अटक!

वडके यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

mumbai-mns-leader-vrushant-wadke-arrested-in-rape-case-news-update-today
mumbai-mns-leader-vrushant-wadke-arrested-in-rape-case-news-update-today

मुंबई: मुंबईतील मनेसेचा नेता वृशांत वडके (vrushant wadke) याला बलात्काराच्या आरोपाखील अटक करण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (BMC Election) तिकीट मिळवून देतो, असे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला, असा आरोप वडके याच्यावर करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मंबई महानगरपालिकेचे तिकीट देतो, असे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप मनसेचा नेता वृशांत वडकेवर करण्यात आला आहे. या आरोपाप्रकरणी वडके याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

हेही वाचा: राहुल गांधींनी महागडा शर्ट घातला काय किंवा उघडे फिरले काय, फरक फडत नाही; तुम्ही मात्र उघडे पडताय

वडकेवर बलात्कारासोबतच धमकावल्याचाही आरोप आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तिकीट मिळवून देतो, असे म्हणत गैरफायदा घेतल्याचं एका महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीत महिलेने काय म्हटले आहे?

एका ४२ वर्षीय महिलेने वडके यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ या कालावधित विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवत वडके यांनी माझी फसवणूक केली. तसेच येणाऱ्या मनपा निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचेही आमिष वडकेंनी दाखवले, असा आरोप या महिलेने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here