Dr Gaffar Quadri : डॉ. गफ्फार कादरींचा आज काँग्रेस पक्षात प्रवेश!

दिल्लीत प्रवेश सोहळा, पूर्वमधून काँग्रेसकडून उमेदवारी

मुंबई : एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन डॉ. गफ्फार कादरी आज शुक्रवार (ता. २४) ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. कादरी यांना पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे. पहिल्याच यादीत त्यांच्या नावाचा समावेश असणार आहे. अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

डॉ. गफ्फार कादरी हे गेल्या दहा वर्षापासून एमआयएम पक्षात काम करत होते. दोन वेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून ते काम करत होते. मात्र, विधानसभेचे तिकीट त्यांना नाकारल्यात होते. डॉ. कादरींच्या विरोधात एमआयएमच्या नगरसेवकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यानंतर डॉ. कादरी यांनी थेट हैदराबादला जाऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला असता त्यांना भेट नाकारल्यात आली होती. त्यानंतर डॉ. गफ्फार कादरी यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे देवेंद्र फडणवीस यांच्या इशा-यावर पक्ष चालवतात असा आरोप केला होता. तसेच अतुल सावेंच्या विरोधात कमजोर उमेदवार देऊन सावेंना मदत करायची असा आरोप करुन हिंमत असेल तर इम्तियाज जलील यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी असे आव्हान केले आहे.

काँग्रेस पदाधिकारी, डॉ.कादरी दिल्लीत…
डॉ. गफ्फार कादरी हे दिल्लीत असून तळ ठोकून असून त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही पदाधिकारीही दाखल झाले आहेत. काही पदाधिकारी हे शुक्रवारी सकाळी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. तेथे अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष खा. इमरान प्रतापगढी यांच्या उपस्थितीत डॉ.गफ्फार कादरींचा प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे.

पूर्वमध्ये काँग्रेसकडे नव्हता चेहरा…
पूर्व मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून लढण्यासाठी मोठा चेहरा नव्हता. जनाधार नसलेल्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विशेष म्हणजे उमेदवारी कुणाला द्यायची असा प्रश्न काँग्रेस पक्षश्रेष्ठीला पडला होता. शहरातील पूर्व मतदारसंघ आमचाच पारंपारीक मतदारसंघ आहे. असे सांगून महाविकासआघाडीकडे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना साकडे घातले होते. परंतु चेहराच नसल्यामुळे अखेर पूर्व मतदारसंघात दोन विधानसभा निवडणुकीत अतुल सावे यांना तगडी फाईट देणा-या डॉ.गफ्फार कादरींना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार याच्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे.

विधानसभेत पूर्व मतदारसंघात असे होते चित्र

——————————————————————————————————
 अतुल सावे (भाजप) –          डॉ.गफ्फार कादरी (एमआयएम)
————————————————————
२०१४-  ६४,५२८                            ६०,२६८
————————————————————
२०१९- ९३,९६६                              ८०,०३६
————————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here