Skoda ने लॉंच केला Kushaq SUV चा नवा मॉडेल; पाहा किंमत आणि आकर्षक फीचर्स

skoda-launches-new-model-of-kushaq-suv-learn-the-price-and-attractive-features-news-update
skoda-launches-new-model-of-kushaq-suv-learn-the-price-and-attractive-features-news-update

स्कोडा ऑटो इंडियाने Skoda auto India कुशक एम्बिशन क्लासिक व्हेरियंट Kushaq SUV लॉन्च केला आहे. नवीन मॉडेलच्या किंमती १२.६९ लाख रुपये, एक्स-शोरूम पासून सुरू होते. ही किंमत बेस अॅ्क्टिव्ह व्हेरियंट आणि एम्बिशन व्हेरियंट दरम्यान ठेवण्यात आली आहे. एम्बिशन क्लासिक एमटीची किंमत १२.६९ लाख रुपये एक्स-शोरूम असून एम्बिशन क्लासिक १.० एटी ची किंमत १४.०९ लाख रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे.

कुशकच्या या नवीन मॉडेलमधील काही प्रमुख बाह्य वैशिष्ट्यांमध्ये मागील वायपर आणि डिफॉगर, फ्रंट बंपर एअर इनटेकवरील क्रोम हायलाइट्स, सिल्व्हर फ्रंट आणि रिअर डिफ्यूझर्स, इलेक्ट्रिकली फोल्ड करण्यायोग्य ओआरव्हीएम, १६-इंच अलॉय व्हील, सिल्व्हर रूफ रेल, इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय, यात शार्क-फिन अँटेना, डीआरएल सह एलईडी हेडलॅम्प आणि कॉर्नरिंग फंक्शनसह फ्रंट फॉग लाइट्स देखील मिळत आहेत.

नवीन मॉडेलच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात १.०-लिटर, तीन-सिलेंडर, टीएसआय पेट्रोल इंजिन मिळते, जे ११४ बीपीएचची कमाल पॉवर आणि १७८ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. ही कार सहा स्पीड मॅन्युअल तसेच सहा स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिटमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान, कंपनी ९ मे रोजी कुशक मॉन्टे कार्लो व्हेरिएंटची घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

नवीन कुशक अॅ,म्बिशन क्लासिकच्या केबिनमध्ये अॅमपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सह १० इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये लेदर स्टीयरिंग व्हील, मागील पार्किंग कॅमेरा, कूल्ड ग्लोव्ह-बॉक्स, मागील पार्सल ट्रे, पॅडल शिफ्टर्स, क्रूझ कंट्रोल आणि सभोवतालची प्रकाश व्यवस्था यांचा समावेश आहे. हाय-स्पेक अॅ,म्बिशन व्हेरियंटमध्ये काळ्या फॅब्रिक सीटसह ड्युअल कलर स्पोर्टी सेंटर स्ट्राइप्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मायस्कोडा कनेक्ट यासारख्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here