Tiger Shroff l टायगरने शेअर केलं ‘या’ चित्रपटाचं पोस्टर

टायगर लवकरच ‘गणपथ’ या चित्रपटात झळकणार

tiger-shroff-to-star-in-vikas-bahl-ganapath
tiger-shroff-to-star-in-vikas-bahl-ganapath

अभिनेता टायगर श्रॉफ Tiger Shroff सोशल मीडियावर अनेकदा सक्रीय असतो. त्याच्या वर्कआऊट किंवा डान्सचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो. यावेळी त्याने त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. टायगर श्रॉफ Tiger Shroff लवकरच ‘गणपथ’ या चित्रपटात झळकणार आहे.

टायगर श्रॉफ ने Tiger Shroff शेअर केलेल्या पोस्टरमध्ये पुन्हा एकदा त्याचा अॅक्शनपॅक अवतार पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मोशन पोस्टरमध्ये टायगरचा एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर गाजत आहे.”जब अपून डरता हैं ना, तब अपून बहोत मारता हैं”, असा डायलॉग टायगर श्रॉफ म्हणताना दिसत आहे

.

“मी आतापर्यंत केलेल्या चित्रपटांपेक्षा या चित्रपटाची कथा थोडी वेगळी आहे. या चित्रपटासाठी माझी, जॅकी भगनानी आणि विकास बहल यांच्यासोबत अनेकदा चर्चा झाली. मला चित्रपटाची कथा विशेष आवडली असून विकाससोबत काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे”, असं टायगर श्रॉफ Tiger Shroff म्हणाला.

हेही वाचा l WhatsApp Pay l आता Whatsapp वरुन पैसे करा ट्रान्सफर

दरम्यान, विकास बहल दिग्दर्शित ‘गणपथ’ या चित्रपटाचं चित्रीकण जून किंवा जुलै २०२१ मध्ये सुरु होणार असून हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या टायगरच्या नावावरचा पडदा जरी दूर झाला असला तरी त्याच्यासोबत अजून कोणते कलाकार झळकणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा l New Hyundai i20 l नवी ह्युंदाई i20 लाँच 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here