NCP : पक्ष वाढीसाठी मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी : राजेश टोपे

ncp- aurangabad-worker-meeting-mla-ex-minister-rajesh-tope-news-update-today
ncp- aurangabad-worker-meeting-mla-ex-minister-rajesh-tope-news-update-today

औरंगाबाद : पक्ष वाढीसाठी संपर्कप्रमुख या नात्याने मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी उभा आहे. अशी ग्वाही माजी आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादीचे काँग्रेसचे संपर्क प्रमुख राजेश टोपे (Rajesh Tope) दिली. ज्या ठिकाणी माझी गरज असेल त्या ठिकाणी मी हजर राहील असेही ते म्हणाले.

औरंगाबादेत राष्ट्रवादी पूर्व विधानसभा कार्यकर्ता मेळावा आणि पद नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन वडजे मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी टोपे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान अशोक गायकवाड, दिलीप हरणे, वसंत महाराज, गणेश सोनार, बाळासाहेब सोनवणे, अमोल जाधव, माणिकराव शिंदे, सुभाष जगताप या विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा मेहराज पटेल, मंजुषा पवार, प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमाणी, प्रदेश सचिव प्रा. माणिकराव शिंदे, डॉ. बाळासाहेब पवार, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. मयुर सोनवणे, कार्याध्यक्ष कय्युम अहेमद, मोहम्मद हबीब, मुन्ना खान. अय्युब खान, मुक्तार खान, इब्राहिम पठाण, शेख आसिफ, मोतीलाल जगताप यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन रवींद्र तांगडे पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मोहम्मद हबीब यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठलराव जाधव आणि जावेद खान यांनी केले होते.

सर्वांना सोबत घेऊन काम सुरु- ख्वाजा शरफोद्दीन,शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

मी सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून पक्ष वाढीसाठी काम करत आहे. शहराध्यक्ष झाल्यापासून कार्यक्रम सुरु आहेत. राष्ट्रवादी पक्षामध्ये शेकडो लोकांचा प्रवेश करुन घेतला. मनपामध्ये  राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू. सध्या घर-घर चलो अभियानाची सुरुवात पक्षवाढीसाठी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here