Gautam Adani : गौतम अदानी जगातले तिसऱ्या क्रमांकाचे अतिश्रीमंत, पाहा किती आहे संपत्ती

hindenburg-research-reply-to-adani-group-413-page-response-to-its-allegations-news-update-today
hindenburg-research-reply-to-adani-group-413-page-response-to-its-allegations-news-update-today

Gautam Adani World’s 3rd Richest Person: अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांनी लुई व्हिटॉनचे अध्यक्ष आणि सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकून ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत टॉप ३ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. हा मान मिळवणारे अदानी हे आशिया खंडातील पहिले व्यावसायिक ठरले आहेत. विशेष म्हणजे चीनचे जॅक मा आणि भारताचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना सुद्धा आजवर हे करणे शक्य झालेले नाही.

प्रतिष्ठित श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क (२५१ अब्ज डॉलर्स) आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (१५३ अब्ज डॉलर्स) यांच्यापाठोपाठ १३७.४ अब्ज डॉलर्ससह अदानी यांनी तिसरे स्थान पटकावले आहे. अदानी यांच्या संपत्तीत +१. १२ अब्ज डॉलरची शेवटची वाढ दिसली होती, तर या संपूर्ण वर्षात तब्बल ६०.९ अब्ज डॉलरचा व्यवहार झाला आहे.

बिल गेट्सना टाकले मागे

जुलै २०२२ मध्ये, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून अदानी ११३ अब्ज डॉलर्ससह जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले होते. यानंतर सामाजिक कार्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतल्याने गेट्स यांची संपत्ती ११७ अब्ज डॉलरवर घसरली परिणामी अदानी यांना गेट्सना मागे टाकून चौथ्या श्रीमंत व्यक्तीची जागा मिळवता आली.

अदानी यांच्यासाठी २०२२ ठरलं खास

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अदानी यांनी २०२२ मध्ये त्यांची संपत्ती ६० अब्ज डॉलर्सने वाढवली आहे, जी इतर कोणाहीपेक्षा पाचपट जास्त आहे. फेब्रुवारीमध्ये अंबानींना आशियातील सर्वात श्रीमंत म्हणून मागे टाकत आणि दोन महिन्यांनंतर एप्रिलमध्ये सेंटिबिलियनर (ज्यांची संपत्ती १०० अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिक आहे) अशा यादीत अदानी यांचे नाव नोंदवले गेले.

अदानी नेमके कुठे करतात गुंतवणूक?

>>सिमेंट – मे महिन्यात, अदानी समूहाने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सिमेंट उत्पादक होण्यासाठी होल्सिम एजीचे भारतातील सिमेंट व्यवसाय १०.५ अब्ज डॉलरमध्ये विकत घेतले.

>>वीज – ऑगस्टमध्ये, भारतातील सर्वात मोठी खाजगी औष्णिक उर्जा उत्पादक अदानी पॉवरने सांगितले की ते थर्मल पॉवर प्लांट ऑपरेटर डीबी पॉवरला ७,०१७ कोटीमध्ये खरेदी केले.

>>बंदरे – जुलैच्या मध्यात, इस्रायलने भूमध्य सागरी किनार्या वरील प्रमुख व्यापार केंद्र म्हणजेच हायफा बंदर, अदानी पोर्ट्स, स्थानिक रसायने आणि लॉजिस्टिक समूह गॅडॉट यांना १. १८ अब्ज डॉलर्समध्ये विकण्याची घोषणा केली.

>>रस्ते मालमत्ता – या महिन्याच्या सुरुवातीला, अदानी यांनी एक युनिट मॅक्वेरी एशिया इन्फ्रास्ट्रक्चर फंडचे इंडिया टोल रोड आंध्र प्रदेश आणि गुजरात राज्यांमध्ये ३, ११० कोटी रुपयांना खरेदी करत असल्याची घोषणा केली.

दरम्यान, २४ जून रोजी त्यांच्या ६० व्या वाढदिवशी, अदानी यांनी सामाजिक कार्यासाठी ६०, ००० रुपयांची देणगी देऊन समाजाला हातभार लावण्याचे काम देखील केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here