अनिल देशमुखांना दिलासा:’सीबीआय’ची याचिका हायकोर्टाने फेटाळली; तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा

Ncp-leader-ex-minister-anil-deshmukh-relief-from-bombay-high-court-news-update-today
Ncp-leader-ex-minister-anil-deshmukh-relief-from-bombay-high-court-news-update-today

मुंबई: ‘महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीनाला सीबीआयने दिलेल्या आव्हानावर आज (27 डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शेवटची मुदत होती. या पार्श्वभूमीवर आज अनिल देशमुखांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला. ‘सीबीआय’ने दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे अनिल देशमुख उद्याच तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यावेळी ‘सीबीआय’कडून या जामीनावर आक्षेप घेत स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुखांच्या जामीनाला स्थगिती देण्यात आली होती.

या जामीनाला दिलेली वाढीव स्थगितीची मुदत आज संपत होती. ‘सीबीआय’च्या वकीलांकडून आज पुन्हा एकदा स्थगितीची मागणी करण्यात आली. मात्र, आता मुंबई हायकोर्टाने ती फेटाळून लावली आहे.

सीबीआयच्या हालचालींवर लक्ष

बुधवारी (दि. 28) अनिल देशमुख मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येतील. ‘सीबीआय’च्या वकिलांकडून आज सायंकाळपर्यंत कुठल्या हालचाली होतात हे देखील पाहावे लागणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टातून रिलीज ऑर्डर घेतली जाईल. शुअ‌ॅरीटी बाँड भरून इतर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनिल देशमुख उद्याच तुरुंगातून बाहेर येतील.

काय आहे प्रकरण…

1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत ते तुरुंगातच आहेत. ईडीने अनिल देशमुखांना अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ‘सीबीआय’कडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून अनिल देशमुख यांच्याविरोधात तपास सुरू होता.

मागील महिन्यात अनिल देशमुखांना ईडी प्रकरणात जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने ‘सीबीआय’च्या प्रकरणातही अनिल देशमुखांना सशर्त जामीन मंजूर केला. परंतु त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आता देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here