Plasma bags : प्लाझ्मा बॅग साडेपाच हजारात; जास्त दर आकारल्यास रक्तपेढीचा परवाना रद्द

Plasma bags-will-be-available-in-rupees-five-thousand-and-five-hundred-says- rajesh-tope
Plasma bags-will-be-available-in-rupees-five-thousand-and-five-hundred-says- rajesh-tope

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यासाठी प्लाझ्माच्या (Plasma bags ) प्रती डोसची किंमत निश्चित करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत तज्ज्ञ समिती नेमण्यात करण्यात आली होती. प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार (five-thousand-and-five-hundred) इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Plasma bags
Plasma bags

प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने प्लाझ्मा संकलित करण्यासाठी लागणारे खर्च व राष्ट्रीय रक्त धोरणानुसार निश्चित केलेलल्या रक्तावरील अतिरिक्त चाचण्यांवर आकारण्यात येणारे सेवा शुल्क लक्षात घेऊन दर निश्चिती केलेली आहे. त्यानुसार प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मिली) ५,५०० रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करोनाबाधितांवर ट्रायल बेसिसवर नि:शुल्क प्लाझ्मा थेरेपी उपचार पध्दती वापरण्यात येत आहे. केंद्र शासन व सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशने ऑफ लेबल प्लाझ्मा थेरेपी वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना केल्यानंतर प्लाझ्माफेरॅसिस पध्दतीने संकलित करण्यात आलेल्या कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा (ऑफ लेबल) वापरण्यासाठी खाजगी व विश्वस्त रक्तपेढ्यांकडून प्लाझ्मा थेरेपीसाठी आवश्यक प्लाझ्मा बॅगसाठी जास्त शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले.

या चाचणीसाठी कमाल दर १,२०० रुपये प्रति चाचणी

नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करुन दिल्यास या चाचणीसाठी कमाल दर १,२०० रुपये प्रति चाचणी (प्लाझ्मा बॅगेच्या किंमतीव्यतिरक्त) तर केमिल्युमिनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रतिचाचणी कमाल दर ५०० रुपये (प्लाझ्मा बॅग किंमती व्यतिरक्त) आकारण्यास मान्यता दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here