Bihar assembly election 2020 : प्रकाश आंबेडकरांची ओवेसींना पुन्हा एकत्र येण्याची साद

पाहा VIDEO, काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar's call for Owaisi to reunite
प्रकाश आंबेडकरांची ओवेसींना एकत्र येण्याची पुन्हा साद Prakash Ambedkar's call for Owaisi to reunite

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने बिहार विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. ( Bihar assembly election 2020 ) त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमला,बिहारच्या मुस्लिम मतदारांना सोबत येण्यासाठी साद घातली आहे. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम मतदारांना साद घातली होती. विधानसभेत वंचित आणि एमआयएम मध्ये जागा वाटपावरून बिनसले होते. आता बिहारमध्ये एकत्र लढण्यासाठी प्रकाश आंबेडकर प्रयत्नशील आहेत. Vanchit  Bahujan  Aghadi President Prakash Ambedkar hints alliance for Bihar Elections )

पाहा VIDEO काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

देशात नवीन राजकीय समीकरण आणण्याचा आमचा प्रयत्न असून त्याची सुरुवात वंचित बहुजन आघाडीने असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाबरोबर युतीने केली होती, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला, भविष्यात असा प्रयत्न परत करु. जे महाराष्ट्रात घडलं नाही, ते बिहारमध्ये घडवून आणू, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला. एनडीएच्या सरकारला सत्तेत येऊ न देणे, हा बिहारमध्ये निवडणूक लढवण्याचा एकमेव उद्देश आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

बिहारमध्ये मुस्लिम, मागासवर्गीय आणि आदिवासी मिळून 40 टक्के समाज आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र आल्यावर कोणत्याही सरकारला पाडण्याची ताकद यांच्यामध्ये आहे. शिवाय हे सरकार नागरिकता, आरक्षण यांच्या विरोधात आहे. त्यामुळे मौलवी, मौलाना तसेच सुशिक्षित मुस्लिम बांधवांना माझे सांगणे आहे की याबाबत विचार करा, आपण सर्वांनी एकत्र येऊन या सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीत पाडू. असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीने राज्यात मोठी ताकद निर्माण केल्यानंतर आता उत्तरेकडे मोर्चा वळवला आहे. वंचित आघाडीने बिहार विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ही निवडणूक स्वबळावर न लढवता समविचारी पक्षांशी आघाडी करून लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. मात्र एमआयएमने अद्यापही त्यांची  भूमिका जाहीर केली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here