औरंगाबादच्या नामांतरावर शरद पवारांनी पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

Ncp-president-sharad-pawar-said-was-unknown-about-renaming-aurangabad-city-decision-news-update-today
Ncp-president-sharad-pawar-said-was-unknown-about-renaming-aurangabad-city-decision-news-update-today

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakckeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने (MVA) आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले.  ठाकरे सरकारने याच शेवटच्या बैठकीत औरंगाबाद तसेच उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव केला. औरंगाबादचे (Aurangabad) नाव संभाजी नगर (Sambhajinagar) तर उस्मानाबाद (Osmanabad) शहराचे नाव धाराशीव (Dharashiv) करण्यात आहे. दरम्यान, या निर्णयावर काँग्रेसचे दिल्लीमधील नेतृत्व नाराज असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयाबाबत राष्ट्रवादीने आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. याची यत्किंचतही माहिती आम्हाला नव्हती, असे शरद पवार म्हणाले. ते औरंगाबाद पत्रकार परिषदेत बोलत होते.

“आमचा किमान रणनीतीचा जो कार्यक्रम केला होता, त्याचा हा भाग नव्हता. हा निर्णय शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावेळी आमच्याशी कोणाशी सुसंवाद नव्हता. निर्णय घेतल्यानंतरच आम्हाला हे समजलं. निषेध वगैरे त्याला अर्थ नाही. आम्ही जो कार्यक्रम ठरवलेला होता, त्याचा हा भाग नव्हता. त्यावेळी आम्हा सर्वांची सामूहिक समंती नव्हती. मंत्रिमंडळाच्या कामाची पद्धत असते. मंत्रिमंडळ कामाच्या पद्धतीमध्ये मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतो. तिथे मतदान नसतं. फक्त मतं व्यक्त केली जातात.

मंत्रिमंडळ बैठकीत मतं व्यक्त केली गेली. मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतो, त्याच पद्धतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला. हा भाग किमान समान कार्यक्रमात नव्हता. औरंगाबादच्या दृष्टीने अधिक महत्त्वाच्या काही गोष्टी केल्या असत्या, तर इथल्या जनतेला त्याचा आनंद झाला असता, असे शरद पवार म्हणाले.

“शासकीय धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी चर्चा करण्याची जी पद्धत होती, त्यामध्ये काहीही चर्चा झाली नाही. या प्रश्नापेक्षा औरंगाबादच्या दृष्टीने अधिक महत्त्वाच्या काही गोष्टी केल्या असत्या तर इथल्या जनतेला त्याचा आनंद झाला असता. एक भावनेचा प्रश्न उपस्थित झाला नसता, तर मला आनंद झाला असता. पक्ष म्हणून हा निर्णय घेतलेला नव्हता. आमच्या पक्षाच्या व्यासपीठावर याची चर्चा झाली. असा एकही प्रसंग नाही जो माझ्या कानावर आला नाही,” असेही शरद पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here