Bholaa Trailer : अजय देवगण व तब्बूच्या ‘भोला’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

ajay-devgan-tabbu-bholaa-movie-trailer-release-watch-most-intresting-video-see-details-news-update-today
ajay-devgan-tabbu-bholaa-movie-trailer-release-watch-most-intresting-video-see-details-news-update-today

अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. ‘दृश्यम २’ला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. आता अजयच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजयचा ‘भोला’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ट्रेलरकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेरीस ‘भोला’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

जवळपास २ मिनिटं ३३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अजय व तब्बूचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. अॅआक्शन सीन्स, क्राइम थ्रीलर असा हा चित्रपट असल्याचं ट्रेलरमधून दिसून येत आहे. ट्रेलरमध्ये अजयसह तब्बू भलतीच भाव खाऊन गेली आहे. शिवाय ट्रेलरच्या बॅकग्राऊंड म्युझिकने लक्ष वेधून घेतलं आहे.

तब्बू पोलिस ऑफिसरच्या भूमिकेमध्ये दिसत आहे तर अजय गुन्हेगारांशी दोन हात करताना दिसत आहे. ट्रेलरच्या शेवटी अजयच्या हातामध्ये त्रिशुळ पाहायला मिळत आहे. ट्रेलरमधील अजयच्या अॅपक्शन सीन्सची झलक विशेष कौतुकास्पद आहे. तर काही मिनिटांमध्येच ‘भोला’च्या ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

हा ट्रेलर चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहे. तर अजय व तब्बूच्या लूकचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. ‘भोला’ हा दाक्षिणात्या चित्रपट ‘कॅथी’चा हिंदी रिमेक आहे. अजय-तब्बूसह राय लक्ष्मी, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा आदी कलाकारांच्या यामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या ३० मार्चला ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here