ड्रग प्रकरणी कंगणाची चौकशी करावी !:सचिन सावंत

arvind-kejriwal-cm-Delhi-on-currency-note-goddess-photos-congress-leader-sachin-sawant-slams-bjp-aap-news-update-today
arvind-kejriwal-cm-Delhi-on-currency-note-goddess-photos-congress-leader-sachin-sawant-slams-bjp-aap-news-update-today

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत हीने स्वतःच ड्रग घेत असल्याची एका व्हिडिओमध्ये कबुली दिली आहे. कंगणा मित्रांनाही ड्रग्जसाठी जबदरस्ती करत होती अशी विधाने व काही व्हिडिओच्या माध्यमातूनही स्पष्ट होत आहे. या सर्वाची दखल घेत नार्कोटिक्स विभागाने कंगणाची ड्रग्ज संदर्भात चौकशी केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

भाजपाने देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे

सावंत म्हणाले की, कंगणा राणावत सारख्या व्यक्तीची तुलना भाजपाचे “झांसे के राजा’ आमदार राम कदम यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याशी केली. इतिहासात झाशीच्या राणीचा एवढा मोठा घोर अपमान करण्याची कोणी हिंमत दाखवली नाही. त्याबद्दल भाजपाने देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. कंगणाची पाठराखण करणाऱ्या आमदार राम कदम यांच्यावर भाजपाने कारवाईही केलेली नाही. ते विधान राम कदम यांचे वैयक्तीक आहे असे म्हणून जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे. तसेच कंगणाच्या विधानाशी सहमत नसल्याची सारवासारव भाजपाने केली पण त्यांनी तिच्या विधानाचा साधा निषेधही केलेला नाही.

भाजपा हिताचा अजेंडा चालवणाऱ्या व्यक्तींना संरक्षण देते

मुंबई व महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या, मुंबई पोलीसांना माफीया म्हणणाऱ्या कंगणाला केंद्रातील मोदी सरकारने तत्काळ वाय दर्जाची सुरक्षा दिली, यात फारसे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. भाजपा नेहमीच त्यांच्या हिताचा अजेंडा चालवणाऱ्या व्यक्तींना संरक्षण देते. देशात भाजपाच्या संरक्षणात विवाद उत्पन्न करणारे व विरोधी पक्षाच्या सरकारांची बदनामी करणारे अनेकजण नियुक्त केले आहेत. कंगणाचे बोलवते धनी भाजपा नेते आहेत हे यातून स्पष्ट होत आहे. मुंबईचा व महाराष्ट्राचा कंगनाने केलेला अपमान भाजपाच्या इशाऱ्यावर होता, असेही सावंत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here