Corona : महाराष्ट्रात फक्त १२०० रूपयांत कोरोनाची ‘आरटीपीसीआर टेस्ट’!

corona-test-lower- rates-1200-rtpcr-test-cm-Thackeray-tope
corona-test-lower- rates-1200-rtpcr-test-cm-Thackeray-tope

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने कोरोनाची ‘आरटीपीसीआर’टेस्ट करण्यासाठी दरामध्ये मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा दर आता १२०० रुपये एवढा कमी केला आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी ४५०० रुपये आकारले जात होते. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून कमीत कमी खर्चात ही चाचणी कशी करता येईल, याचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते. तेव्हा या समितीने ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा दर ४५०० रुपयांवरून २२०० रुपयांवर आणला होता.

 शिंदे समितीच्या अहवालानुसार ‘आरटीपीसीआर’ टेस्टचे दर कमी केल्यानंतरही सरकारने पुन्हा चाचणीचे हे दर कमी करण्याचा आग्रह धरला. डॉ. शिंदे यांच्याच समितीने पुन्हा ‘आरटीपीसीआर’ टेस्टचे दर १२०० रुपयांवर आणण्याची शिफारस केली. त्यानुसार आज आरोग्य विभागाने खासगी चाचणी केंद्रात कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ टेस्ट केल्यास १२०० रुपयेच आकारावेत, असा आदेश जारी केला. घरून जर नमुने घेतले तर मात्र १६०० रुपये मोजावे लागतील.

राज्य शासनाच्या पातळीवर गेल्या महिन्यात चाचणीचे दर ४५०० रुपयांवरून २२०० रुपये करण्यात आले असून हे दर आणखी कमी करावयाचे असल्यास केंद्रसरकारने ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी लागणारे रिएजंटस् व अन्य बाबींवरील जीएसटी व इतर शुल्क माफ केले पाहिजे. तसे केल्यास या चाचणीचा दर सध्याच्या २२०० रुपयांवरून कमी होऊ शकतील हे लक्षात आले होते. त्यानुसार डॉ. शिंदे यांच्या समितीने आता कोरोना चाचणीचे दर १२०० रुपये केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here