शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची इनोव्हा गाडी जाळण्याचा प्रयत्न

shivsena-mla-sanjay-gaikwad-car-burned-by-unknown-people-news-update
shivsena-mla-sanjay-gaikwad-car-burned-by-unknown-people-news-update

बुलढाणा: बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची इनोव्हा कार क्रमांक एम.एच-28/बीजे-3132 जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून तपास सुरु केला आहे. वाहन जाळण्यापूर्वी आरोपींनी परिसरातील वीज पुरवठा खंडीत केला होता. दरम्यान संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली आहे. Shivsena-mla-sanjay-gaikwad-car-burned-by-unknown-people-news-update

गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची इनोव्हा कार जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते. रात्री दीड वाजता ते बुलढाणा येथील घरी परत आले. त्यानंतर तीन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले. त्यांनी कारच्या इंधनाच्या टाकीजवळील भाग पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी इतरही वाहनं उभी होती. त्यामुळे आगीचा भडका उडून मोठी हानी होण्याची शक्यता होती.

हेही वाचा : उत्तर प्रदेशात प. बंगालसारखी गत होऊ नये, म्हणून सगळेच कामाला लागले

दरम्यान, या प्रकारापूर्वी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here