औरंगाबाद शहरातील प्रश्न मार्गी लावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल!

राष्ट्रवादी काँग्रेसचा मनपा आयुक्तांना इशारा, मागण्यांचे निवेदन सादर

Sort out the issues in the city otherwise, Aurangabad NCP will hit the streets
Sort out the issues in the city otherwise, Aurangabad NCP will hit the streets

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील रस्त्यांवरील खड्डे, पाण्याची समस्या, मोकाट कुत्रे, साफसफाई, रमाई आवास घरकुल योजना यासह इतर मागण्या त्वरीत मार्गी लावाव्या. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (Nationalist Congress Party) औरंगाबाद महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी (Dr. Abhijeet chaudhari) यांना निवेदनाव्दारे शुक्रवारी करण्यात आली. सर्व मागण्यांवर महिनाभरात तोडगा काढला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयुक्तांना देण्यात आला.

शहरात स्मार्टसिटी अंतर्गत रस्तांचे काम सुरु आहे. परंतु अंतर्गत रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. आज रस्त्यांवरून नागरिक चालू शकत नाही अशी अवस्था झाली आहे. पिण्यासाठी सहा दिवसाआड पाणी मिळतो. ब-याच वसाहतींमध्ये मनपाचे पाणी नाही. साफसफाईच्या नावाने बोंबाबोंब झाली आहे. दिव्यांगाना सोयीसुविधा दिल्या जात नाही. रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळाले पाहिजे. यासासह अनेक मागण्या मार्गी लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त डॉ.चौधरी यांनी महिनाभरात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील, शहराध्यक्ष ख्वॉजा शरफोद्दीन, युवक काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष डॉ. मयूर सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनोज घोडके, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष कय्यूम अहेमद शेख याच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

अन्यथा रस्त्यावर उतरु…

शहरातील समस्यांपासून आज नागरिक त्रस्त आहेत. मनपा सोयीसुविधा देण्यात असमर्थ ठरली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सर्वच शहरवासियांना होत आहे. नागरिक करभरतात परंतु त्यांना सोयीसुविधा मिळत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने सोयीसुविधा दिल्या पाहिजे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही.  

कैलास पाटील, (माजी आ. तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

अन्यथा आम्ही करभरणार नाही…

रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहे. सातारा-देवळाई परिसराची अवस्था इतकी वाईट झाली आहे की खेडेगाव बरे असते. पिण्यासाठी पाणी नाही,रस्ते नाही, लाईटची सुविधा नाही. नागरिकांनी जगणे मुश्किल झाले आहे. जर अशीच परिस्थिती असली तर आम्ही जनतेला कर भरू देणार नाही. तुम्ही सुविधा द्या आम्ही करभरायला लावू.

ख्वाजा शरफोद्दीन,(शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टाईलने उत्तर देऊ…

शहरातील समस्यांपासून नागरिकांची सुटका व्हावी. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. ऐतिहासिक शहर समस्यांचे माहेरघर बनले आहे. आज नागरिकांचे हाल होत आहे. रस्ते,पाणी,सफाई अशा विविध समस्यांबाबत आम्ही मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले. आयुक्तांनी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. दिवाळीपर्यंत कामांना सुरुवात झाली पाहिजे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टाईलने आम्ही आंदोलन करु.

डॉ. मयूर सोनवणे, (शहरजिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here