भाजपला उत्तराखंडमध्ये 4 महिन्यातच मुख्यमंत्री बदलण्याची नामुष्की ओढवली, कारण…

नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी आज शनिवारी भाजप आमदारांची बैठक होईल.

uttarakhand-bjp-chief-minister-tirath-singh-rawat-resigned-news-update
uttarakhand-bjp-chief-minister-tirath-singh-rawat-resigned-news-update

देहरादून l भाजपशासित उत्तराखंडचे मुख्यमंत्री Uttarakhand CM तिरथ सिंह रावत Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat  यांनी आपले सहकारी मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांच्यासह शुक्रवारी रात्री उशिरा राज्यपाल बेबी राणी मौर्य Governor Baby Rani Maurya यांची भेट घेऊन आपला राजीनामा Tirath Singh Rawat Resigns सोपवला.

काही मिनिटांतच उरकलेल्या या मर्यादित औपचारिक बैठकीत राज्यपालांनी मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांना नवीन मुख्यमंत्री निवडला जाईपर्यंत आपल्या पदावर कायम रहाण्यास सांगितलं. राजीनामा दिल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलं, की राज्यपालांकडे राजीनामा देऊन आलो आहे. घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाले होते. यामुळे मला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं योग्य वाटलं.

रावत पुढे म्हणाले, की मी माझ्या केंद्रीय नेतृत्वाचा आभारी आहे. नेतृत्वानं मला वेळोवेळी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. मी मनापासून पंतप्रधान मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानतो. कोरोनाची लागण झाल्यामुळे अधिक वेळ मिळाला नाही.

जेपी नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात तिरथ सिंह रावत म्हणाले, की “ संविधानाच्या कलम 164-अ नुसार मुख्यमंत्र्यानं 6 महिन्याच्या आत विधानसभा सदस्य होणं अपेक्षित आहे. मात्र, कलम 151 प्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुका होण्यास केवळ 1 वर्षाचा कालावधी शिल्लक असेल तर पोटनिवडणूक घेता येत नाही. त्यामुळे राज्यात संवैधानिक संकट तयार होऊ नये म्हणून मी राजीनामा देऊ इच्छित आहे.”

राजीनामा देताना उत्तराखंडचे भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक म्हणाले, “ही चूक नाही कारण कोविडची परिस्थिती नसती तर निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या असत्या. घटनात्मक मंडळाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा आदर करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत अनेकदा निवडणुका घेण्यात आल्या आहेत मात्र कोविडच्या परिस्थितीमुळे निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचं पालन करायला हवं.

याआधी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत सुबोध उनियाल, अरविंद पांडे आणि आमदार राजेश शुक्ला हेदेखील उपस्थित होते. याशिवाय पत्रकार परिषदेत मुख्य सचिव ओम प्रकाश, मुख्य सल्लागार शत्रुघ्न सिंह हे देखील उपस्थित होते. सीएम तिरथ यांनी आपली कामगिरी मीडियासमोर सांगितली आणि बर्‍याच घोषणा केल्या. मात्र, त्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन मौन बाळगले.

रावत 10 मार्च रोजी झाले होते मुख्यमंत्री

तीरथ सिंह रावत यांनी 10 मार्च रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. 10 सप्टेंबरपर्यंत ते आमदार होणं आवश्यक होतं. तीरथ सिंह रावत मार्च 2021 मध्येच मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या जागेवर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्रिवेंद्र सिंह रावत यांना पक्षांतर्गत विरोध होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला होता.

यानंतर केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री बदलाचा निर्णय घेतला. त्रिवेंद्र सिंह रावत जवळपास 4 वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. कारण ते या शर्यातीतच नव्हते. तीरथ सिंह रावत पौरी लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना 10 सप्टेंबरपर्यंत विधानसभेचा सदस्य होणं बंधनकारक होतं.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here