Anil Deshmukh l अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स, ‘या’ तारखेला हजर राहण्याचे दिले आदेश

kolhapur-anil-ncp-mla-deshmukh-on-jayant-patil-ed-inquiry-ncp-bjp-in-marathi-news-update-today
kolhapur-anil-ncp-mla-deshmukh-on-jayant-patil-ed-inquiry-ncp-bjp-in-marathi-news-update-today

मुंबई:राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांना ईडीने तिसरं समन्स ED issues third summons बजावलं आहे. देशमुख यांना येत्या 5 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी देशमुख दिल्लीला रवाना झाले असून सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

अनिल देशमुख यांना ईडीने दोनदा समन्स बजावलं होतं. आधी त्यांनी प्रकृती ठिक नसल्याचं कारण देऊन ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले होते. नंतर त्यांनी सात दिवसाची मुदत मागवून घेतली होती. येत्या सोमवारी 5 जुलै रोजी त्यांची ही मुदत संपत आहे. त्यामुळे ईडीने आज त्यांना समन्स बजावलं असून सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशमुख सोमवारी ईडीच्या चौकशीला सामोरे जातात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अनिल देशमुख दिल्लीत

दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर देशमुख दिल्लीला रवाना झाले आहेत. देशमुख दिल्लीत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून कायदेशीर बाबींबाबत सल्ला घेणार आहेत. तसेच ते सर्वोच्च न्यायालयातही धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ईडीचा कागदपत्रं देण्यास नकार

दरम्यान, ईडीने देशमुख यांच्याकडे काही कागदपत्रं मागितली आहे. त्यासाठी देशमुख यांनी ईडीकडे ‘ECIR’ ची कॉपी मागितली होती. ती देण्यास ईडीने नकार दिल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, एप्रिल महिन्यात आधी देशमुख यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर आता देशमुख यांची ईडीने चौकशी सुरु केली आहे. 25 जून रोजी ईडीने देशमुख यांच्या पाच ठिकाणांवर छापेमारी केली. त्यानंतर ईडीने देशमुख  यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे  आणि संजीव पालांडे  यांना अटक केली. अंमलबजावणी संचालनालय मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा

Herbal Tea l ‘याचहाचे करा सेवन, मळमळ आणि पोटदुखीपासून मिळेल सुटका…

भाजपला उत्तराखंडमध्ये 4 महिन्यातच मुख्यमंत्री बदलण्याची नामुष्की ओढवली, कारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here