सत्ता गेल्यामुळे विरोधकांचा तमाशा; संजय राऊतांचा टोला

sanjay-raut-tweet-kirit-neel-somaiya-father-son-will-go-to-jail-sanitization-work-in-progress-wait-and-watch-news
sanjay-raut-tweet-kirit-neel-somaiya-father-son-will-go-to-jail-sanitization-work-in-progress-wait-and-watch-news

मुंबई : कंगना रनोटचा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही त्यावर बोलणेही बंद केले. कुठला पक्ष महाराष्ट्र आणि देशाबद्दल काय विचार करतो. त्यांचे विचार किती वाईट आहेत. फक्त इतक्यासाठी तुमची सत्ता गेली त्यामुळे तुम्ही हा तमाशा करत आहात. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला.

‘अभिनेत्री कंगना रनोटने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. ‘कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही त्यावर बोलणेही बंद केले, आता ज्याला जे करायचे ते करावे. पण आम्ही प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवू. जे कोणी मुंबई- महाराष्ट्रात येतात त्यातील कोणालाही आम्ही बाहेर जायला सांगितले नाही. फक्त मुंबई-महाराष्ट्राला आपले म्हणा.

जे होत आहे आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत

इतिहासाचे पाने नेहमी बदलत असतात, नवीन इतिहास लिहिला जातो, पण जुन्या इतिहासाची पाने फाडली जात नाहीत. त्यामुळे जे होत आहे आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत आणि पाहात आहोत की कुठला पक्ष महाराष्ट्र आणि देशाबद्दल काय विचार करतो. त्यांचे विचार किती वाईट आहेत आणि फक्त इतक्यासाठी कारण तुमची सत्ता गेली. त्यामुळे तुम्ही हा तमाशा करत आहात,’ असे राऊत म्हणाले.

‘राजकारणात हे पहिल्यांदा झालेलं नाही. सत्ता येते सत्ता जाते, सरकार बनतं सरकार जाते, पण राज्य आणि देशाची जनता नेहमी असते, त्यांच्यासाठी आम्हाला काम करायचे असते. ज्याप्रकारचे वातावरण महाराष्ट्रात काही लोकांनी तयार केले आहे, मला असे वाटते की ते समाजासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी चांगले नाही,’असे मत राऊत यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here