मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पाणीपुरी स्टॉलवर पाणीपुरी बनवण्याचा मोह आवरत नाही; पाहा Video

west-bengal-chief-minister-mamata-banerjee-serves-panipuri-at-a-stall-during-her-visit-to-darjeeling-news-update-today
west-bengal-chief-minister-mamata-banerjee-serves-panipuri-at-a-stall-during-her-visit-to-darjeeling-news-update-today

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banerjee) या सर्वसामान्य लोकांमध्ये कायम वावरत असतात. लोकप्रियतेमुळे कायमच चर्चेत असतात. त्यांचा वेगळाच अंदाज दार्जिलिंग दौऱ्यादरम्यान दिसून आला. रस्त्याच्या कडेला दुकानं मांडून व्यवसाय करणाऱ्या येथील काही स्थानिक दुकानदारांसोबत चर्चा करता करता ममता बॅनर्जींनी चक्क पाणीपुरी (Panipuri) बनवून आपल्या सहकाऱ्यांना आणि तेथील पर्यटकांना दिल्याचं पहायला मिळालं. ममता बॅनर्जी पाणीपुरी बनवतानाच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी पाणीपुऱ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पुऱ्यांमध्ये उकडलेला बटाटा वगैरे भरुन चिंचेच्या पाण्यात बुडवून लोकांना देताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये पाणीपुरीला पुचका असं म्हटलं जातं. स्वयंरोजगार करणाऱ्या एका महिलेच्या पाणीपुरी स्टॉलला ममता बॅनर्जींनी भेट दिली. दार्जिलिंगमधील हाट येथील दौऱ्यावर असतानाच हा व्हिडीओ तृणमूल काँग्रेसने ट्विट केलाय.

 “आमच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी रविवारी दार्जिलिंगमधील हाट येथे एसएचजीच्या (सेल्फ हेल्प ग्रुप) माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या एका फूड स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी कष्टकरी महिलांचं कौतुक करण्याबरोबरच पश्चिम बंगालमधील लोकप्रिय पुचकाही तयार करुन तेथील मुलांना खाऊ घातला,” अशी कॅप्शन तृणमूल काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करताना दिलीय.

नव्याने निवडून आलेल्या गोरखालॅण्ड टेरिटोरिअल अॅडमिनिस्ट्रेशनच्या सदस्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी ममता बॅनर्जी दार्जिलिंगला आल्या होत्या. मागच्या वेळेस त्यांनी अशाच प्रकारे मोमोज हा येथील स्थानिक लोकप्रिय पदार्थ एका फूड स्टॉलवर तयार केला होता. २०१९ च्या दौऱ्यामध्ये त्यांनी दिघा येथील रिसॉर्टवरील स्टॉलवर लोकांना मोमोज खाऊ घातलेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here