बापरे! सलमान खानचा एवढं महागडं जॅकेट

सलमान खानचा ‘राधे- द मोस्ट वॉन्टेड’ हा नवा अॅक्शनपट

salman-khan-radhe-jacket-see-pic
बापरे! सलमान खानचा एवढं महागडं जॅकेट salman-khan-radhe-jacket-see-pic

सलमान खान आता ‘राधे- द मोस्ट वॉन्टेड’ हा नवा अॅक्शनपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. स्वत: सलमानने देखील एक फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. लक्षवेधी बाब म्हणजे या फोटोमध्ये सलमानने घातलेलं जॅकेट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

Back to shoot after 6 1/2 months … feels good #Radhe

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

या फोटोमध्ये सलमानने एक काळ्या रंगाचं जॅकेट घातलं आहे. या जॅकेटची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या जॅकेटची कंपनी आणि किंमत याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. हे जॅकेट ‘डस्ट ऑफ गॉड’ या कंपनीचे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या जॅकेटची किंमत तब्बल १ लाख २८ रुपये इतकी आहे.

‘डस्ट ऑफ गॉड’ ही कंपनी आपल्या महागड्या कपड्यांसाठी ओळखली जाते. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी या कंपनीचे कपडे वापरतात. “सहा महिन्यानंतर मी शूटिंगवर परतलो आहे. खूप छान वाटतंय.” अशा आशयाची कॉमेंट लिहून सलमानने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

पाहा : रिया जेलबाहेर,हायकोर्टाकडून जामीन मंजूर 

 ‘मोस्ट वाँटेड भाई राधे’ या पोस्टरमध्ये अॅक्शन अंदाजात दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा करत आहे. तर निर्मितीची जबाबदारी सलमानचा भाऊ सोहेल खान याने स्विकारली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कथानकाबाबत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही.

परंतु ‘राधे’ हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘वाँटेड’ या चित्रपटाचा सिक्वेल असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात सलमानने राधे ही व्यक्तिरेखा साकारली होती. यावरुनच या आगामी चित्रपटाची निर्मिती केली जात असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here