नीट प्रकरणी संसदेत चर्चा, विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करणे व पंतप्रधानांनी माफी मागेपर्यंत काँग्रेसचा लढा सुरुच राहणार: हर्षवर्धन सपकाळ

Congress's fight will continue until the NEET issue is discussed in Parliament, cases against students are dropped, and the Prime Minister apologizes: Harshvardhan Sapkal
Congress's fight will continue until the NEET issue is discussed in Parliament, cases against students are dropped, and the Prime Minister apologizes: Harshvardhan Sapkal

मुंबईः नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान Dharmendra pradha यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप हा लढा संपलेला नाहीमोदी सरकारच्या शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभाराविरोधातील काँग्रेस पक्षाचा लढा सुरुच राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांना व या रॅकेट मधील सर्वांना कठोर शिक्षा झाली पाहिजेसंसदेत यावर चर्चा झाली पाहिजेविद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे रद्द केले पाहिजेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी देशाची जाहीर माफी मागितल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाहीअसा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshvardhan Sapkal यांनी दिला आहे. 

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले कीधमेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावाच लागला पण या राजीनाम्याने हुरुळून जाण्याची गरज नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या काळात त्यांनी परिक्षा पद्धतीवर पकड निर्माण करून वन नेशनवन एक्झामिनेशनच्या माध्यमातून १५२ वेळा पेपर लिक केलाएका वर्ग विशेषाला व भाजपाच्या लोकांना फायदा पोहचवण्यात आला व यातून भ्रष्ट मार्गाने पैसे कमवण्यात आले. नीट परिक्षेसाठी पालक जेवढा पैसा खर्च करतात तो केंद्र सरकारच्या पाच विभागातील खर्चापेक्षा जास्त आहे. या रॅकेटची पाळंमुळं खोलपर्यंत गेलेली आहेत. या सर्वांचा शोध लागल्याशिवाय शांत बसता येणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने काँग्रेस पक्षाने सुरु केलेले आंदोलन थांबणार नाहीकँडल मार्चही होणार आहेअसेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here