मुंबई: दिल्लीत जंतरमंतर येथील सीजेपीच्या आंदोलनात jantar mantar cjp protest झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी येत्या २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये विरोधी पक्षांनी देखील सामील व्हावे असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर Prakash ambedkar यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ॲड. आंबेडकर यांनी NEET परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पहिली परीक्षा चुकीच्या पद्धतीने पार पडली असून, फेरपरीक्षेतही अनेक त्रुटी समोर असल्याचा दावा त्यांनी केला. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय असून, सरकारच्या भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे ते म्हणाले. या धोरणाविरोधात देशभर जन आंदोलन उभे राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.














































































































































