रेकॉर्डब्रेक मृत्यू!२४ तासांत 4 लाख 1 हजार ७८ नवे रुग्ण आढळले

देशात पहिल्यांदाच चार हजार १८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद

coronavirus-india-updates-record-4187-deaths-and-4-lakh-new-covid-19-cases-in-india-news-update
coronavirus-india-updates-record-4187-deaths-and-4-lakh-new-covid-19-cases-in-india-news-update

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा तांडव सुरु आहे. दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रत्येकाचीच झोप उडवणारी आहे. देशात अवघ्या २४ तासांत कालावधीत चार हजारांहून अधिक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. ही देशातील एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद असून, २४ तासांत चार लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. coronavirus-india-updates-record-4187-deaths-and-4-lakh-new-covid-19-cases-in-india-news-update

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात २४ तासांत चार लाख एक हजार ७८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख १८ हजार ६०९ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, चिंतेची बाब म्हणजे देशात पहिल्यांदाच चार हजार १८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

हेही वाचा: आखिर WHO ने माना, कोरोना हवा से फैल सकता है

देशात दररोज साडेपाच हजार मृत्यू होतील अशी भीती वजा इशारा अमेरिकेतील इन्स्टिट्यूटने काही दिवसांपूर्वी दिला होता. हा इशारा खरा ठरतोय की, काय अशी शंका गेल्या २४ तासांतील आकडेवारीवरून डोकं वर काढताना दिसत आहे. देशात करोनाचं थैमान सुरू असून, करोनाचा संसर्ग प्रचंड वेगानं वाढत चालला आहे. देशात दररोज चार लाखांच्या आसपास रुग्ण आढळून येत असून, दररोज साडेतीन हजारांच्या सरासरीने मृत्यू होत आहेत. मात्र, गेल्या २४ तासांतील मृतांची संख्या चिंताजनक आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here