महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरातमध्ये नेण्यासाठीच भुपेंद्र पटेलांचा मुंबई दौरा; सचिन सावंतांचा दावा

arvind-kejriwal-cm-Delhi-on-currency-note-goddess-photos-congress-leader-sachin-sawant-slams-bjp-aap-news-update-today
arvind-kejriwal-cm-Delhi-on-currency-note-goddess-photos-congress-leader-sachin-sawant-slams-bjp-aap-news-update-today

मुंबई : गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) भूपेंद्र पटेल (Bhupendrabhai Patel) व्हायब्रंट गुजरातसाठी गुंतवणूक घेऊन जाण्यासाठी मुंबईत उद्योजकांना भेटत आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान (PM Narendra Modi) झाल्यानंतर गुजरातला महाराष्ट्राचे उद्योग घेऊन जाण्याची प्रक्रिया जोरात सुरू केली, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत (sachin sawant) म्हणाले.

यासंदर्भात सावंत म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना महाराष्ट्रातील उद्योग व महत्वाची आर्थिक केंद्रे गुजरातला हलवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेले प्रयत्न आजही सुरुच आहे.

मुंबईच्या हक्काचे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेल्याने यावर्षी देशात सगळ्यात जास्त परकीय थेट गुंतवणूक गुजरातला गेली जी महाराष्ट्रात आली असती. निर्मला सितारामन यांनी सांगितले आहे की आर्थिक प्रवाहाचे मुख्य प्रवेशद्वार हे ‘गिफ्टसिटी’ असेल यातून भाजपाचा उद्देश स्पष्ट होतो.  मुंबईचा देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा काढून घेण्याचा हा डाव आहे, तो महाराष्ट्राने हाणून पाडला पाहिजे.

हेही वाचा

‘सवालों और सच से डरती है सरकार’, 12 राज्यसभा सांसदों के निलंबन पर बोले राहुल गांधी

Omicron Variant: देश में ओमीक्रॉन की एंट्री, क्या हैं इसके लक्षण और बचाव के लिए यह सावधानियां जरूरी

Mahaparinirvan Din: चैत्यभूमीवर येण्याचे टाळा, बाळासाहेब आंबेडकरांचे आवाहन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here